शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 1:58 PM

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानातील अजमेर येथे रेल्वे अपघात घडवण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रुळावर सिमेंटचा मोठा दगड ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. वारंवार समोर येणाऱ्या या घटनांनंतर आता भारतीय रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे.

याबाबत आता रेल्वेमंत्र्यांनीही इशारा दिला आहे. न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केलं. यावेळी, ते म्हणाले की, मी त्यांना (कट रचणाऱ्यांना)  स्पष्टपणे चेतावणी देतो. असे करणाऱ्या प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू. कोणत्याही परिस्थितीत दररोज प्रवास करणाऱ्या देशातील दोन कोटी प्रवाशांचे आम्ही जबाबदारीने संरक्षण करू. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणालाही खेळू देणार नाही. असा प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडू शकतो, त्यामुळं आपण सतर्क राहायला हवे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते. मात्र, सध्याच्या घडीला ४० अपघात झाले आहेत. पण तरीही रात्रंदिवस मेहनत करून स्ट्रक्चर बदलण्यावर इतका भर दिला आहे की, ती ४० ची संख्याही आणखी कमी होईल. आगामी काळात आम्ही अधिक जबाबदारीनं काम करू आणि प्रवाशांची सुरक्षा आणखी सुनिश्चित करणार आहोत.

याचबरोबर, छठच्या दिवशी घरी जाणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, जितक्या ट्रेन चालवल्या जातात, त्या सर्व भरलेल्या असतात. रेल्वेची क्षमता वाढवली जाईल. भारताने एका वर्षात स्वित्झर्लंडइतके रेल्वे ट्रॅक जोडले. दरवर्षी सात हजार डबे बनवले जात आहेत. क्षमता वाढवण्यावर जास्त भर आहे. पुढील १० वर्ष लक्ष केंद्रित असून रेल्वेचा संपूर्ण कायापालट होईल.

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव