रेल्वेमंत्री पियुष गोयलांचं 'फेक ट्विट', व्हिडीओत वाढलाय 'वंदे भारत एक्सप्रेसचा स्पीड'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:31 PM2019-02-11T14:31:52+5:302019-02-11T14:34:20+5:30
वंदे भारत एक्सप्रेस 18 चा स्पीड आणि त्यातील सुविधांवरुन मोदी सरकार मोठ्या प्रमाणात शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. खुद्द रेल्वेमंत्री पियुष योगल यांनीही एक ट्विट करुन या रेल्वेचं आणि तिच्या वायूगती वेगाचं कौतुक केलं आहे.
नवी दिल्ली - रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देशातील सर्वात हायस्पीड ट्रेनचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. मात्र, गोयल यांनी व्हिडीओत छेडछाड करुन हा व्हिडीओ पोस्ट केल्याचा दावा, क्विंट नामक वेबसाईटने केला आहे. 'वंदे भारत' एक्सप्रेस नावाने ही रेल्वे धावत असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून ही ट्रेन बनविण्यात आल्याचा दावाही गोयल यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसने हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले आहे. तर, एका ट्विटर युजर्सनेही हा व्हिडीओ मी बनवला असून तो फॉरवर्डेड असल्याचा म्हटलंय.
वंदे भारत एक्सप्रेसचा स्पीड आणि त्यातील सुविधांवरुन मोदी सरकार मोठ्या प्रमाणात शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. खुद्द रेल्वेमंत्री पियुष योगल यांनीही एक ट्विट करुन या रेल्वेचं आणि तिच्या वायूगती वेगाचं कौतुक केलं आहे. ही एक चिमणी आहे, हे एक विमान आहे, मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत बनणारी ही देशातील सेमी हाय-स्पीड ट्रेन वंद भारत एकस्प्रेस वीजेच्या वेगाने धावाताना दिसत आहे, असेही गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
It’s a bird...It’s a plane...Watch India’s first semi-high speed train built under ‘Make in India’ initiative, Vande Bharat Express zooming past at lightening speed. pic.twitter.com/KbbaojAdjO
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 10, 2019
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शेअर केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा हा व्हिडीओ खरा आहे. मात्र, गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओचा स्पीड वाढविण्यात आल्याचे दिसून येते. इंटरनेटवर या वंदे भारत एक्सप्रेसचा खरा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. द रेल मेल नामक चॅनेलने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्ये, या ट्रेनचा खरा स्पीड दिसून येतो. 20 डिसेंबर 2018 रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. दिल्ली-आग्रा रेल्वेमार्गावर रेल्वेची दुसऱ्यांना ट्रायल घेण्यात आली असून याचा स्पीड 181 किमी प्रतिघंटा आहे.
दरम्यान, काँग्रेसने गोयल यांचे ट्विट रिट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. या ट्विटवरुन काँग्रेसने पियुष गोयल यांना मि. घोटाळा असे म्हटले आहे. तर काँग्रेसच्या सोशल मीडियाप्रमुख दिव्या स्पंदना राम्या यांनीही हा व्हिडीओ शेअर करत, व्हिडीओत छेडछाड करुन, फॉरवर्ड केला असल्याचं राम्या यांनी म्हटलंय.
ओरिजनल व्हिडीओ -