- संतोष ठाकूर मुंबई : रेल्वेमंत्री सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असले, तरी ते फोनद्वारे रोज किमान अर्धा डझन बैठका घेत आहेत. दूर पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत असल्याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. रोज रेल्वेकडे एक लाख प्रवाशांचे फोन येतात. गाड्यांचा विलंब, अस्वच्छता याबाबत अधिक तक्रारी प्रवासी करतात. त्याबाबत काय कारवाई झाली, याची ते माहिती घेत आहेत.सर्वाधिक तक्रारी व सूचना पूर्व, उत्तर रेल्वेबाबत आहेत. मुंबईतून येणाºया बहुतांशी तक्रारी रेल्वेचा वेग व स्वच्छतेविषयी आहेत. उत्तर रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत असल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत, पण तिथे अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्या आहेत.सर्व तक्रारी तपासून, त्याबाबत कारवाई करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे रेल्वेमंत्र्यांनी अधिकाºयांना सांगितले आहे. खरी तीच माहिती द्या, चुकीची माहिती देऊ नका, समस्यांत भर घालू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यासाठी त्यांनी काही मंडळ व्यवस्थापकांशी व्हिडीओद्वारे संवादही साधला आहे.
रेल्वेमंत्री रुग्णालयातून घेतात रेल्वेसेवेची इत्थंभूत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:57 AM