नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. आता लॉकडाऊनमधील निर्बंध उठवण्यात आले असले तरी अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना २०२०-२१ मध्ये वेतन दिलं जाणार नाही, अशा आशयाचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यात आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मेसेजची भर पडली आहे. पीआयबीनं यामागील सत्य सांगितलं आहे. 'रेल्वे मंत्रालयाचा २०२०-२१ मध्ये कर्मचाऱ्यांना पगार किंवा पेन्शन न देण्याचा विचार नाही. अशा प्रकारचं कोणतंही पाऊल रेल्वेकडून उचलण्यात आलेलं नाही,' असं स्पष्टीकरण पीआयबीकडून देण्यात आलं आहे.
आर्थिक अडचणींमुळे 2020-21मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार नाही?; PIBनं सांगितलं मेसेजमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 1:24 PM