नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत (Indian Railways) पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 30 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 716 रिक्त पदे भरती केली जाणार आहे.
WCR अॅप्रेंटिस भरती 2021 रिक्त पदांचा तपशील
इलेक्ट्रिशियन – 135 पदेफिटर – 102 पदेवेल्डर (इलेक्ट्रिक अँड गॅस) – 43 पदेपेंटर (सर्वसाधारण) – 75 पदेमेसन – 61 पदेकारपेंटर -73 पदेप्लम्बर – 58 पदेब्लॅक स्मिथ – 63 पदेवायरमन – 50 पदेसंगणक प्रोग्रामिंग व प्रोग्रामिंग सहाय्यक – 10 पदेमशिनीस्ट– 5 पदेटर्नर – 2 पदेलॅब सहाय्यक – 2 पदेक्रेन सहाय्यक – 2 पदेड्राफ्ट्समन – 5 पदे
डब्ल्यूसीआर अॅप्रेंटिस भरती 2021 शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा संबंधित व्यापारातील आयटीआय प्रमाणपत्र बरोबर असणे आवश्यक आहे.
डब्ल्यूसीआर अॅप्रेंटिस भरती 2021 वयोमर्यादा
15 ते 24 वर्षे (वयानुसार सवलत आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार असेल)
डब्ल्यूसीआर अॅप्रेंटिस भरती 2021 साठी कसा करावा अर्ज
इच्छुक उमेदवार 9 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट घेऊ शकतात.