Indian Railway Recruitment 2020: रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र, यात आणखी 432 जागा वाढल्या असून विभागही बदलला आहे. स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, आरएसी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, प्रिंटर, कारपेंटर, टर्नर अशा विविध ट्रेडसाठी ही भरती काढण्यात आली असून एकूण जागा आता 4931 झाल्या आहेत. य़ा भरतीची महत्वाची बाब म्हणजे कोणतीही परिक्षा न देता 10 वी पास ते आयटीआय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये खासगी कंपन्यांची पुरती वाट लागली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावार गदा आली आहे. अशात सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते बेरोजगारांसाठी वरदान ठरू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत लाखावर सरकारी जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता भारतीय रेल्वेनेही कंबर कसली असून 4931 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
एनएफआर (Northeast Frontier Railway) डिव्हिजनमध्ये ही 4499 भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर South East Central Railway Apprentice Recruitment 2020: साउथ ईस्ट सेंट्रल रेलवे (SECR)च्या विलासपूर विभागात 432 पदांवर भरती काढण्यात आली आहे. यासाठी 30 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. NFR RRC Recruitment 2020 साठी अर्ज करण्याची लिंक बातमीच्या अखेरीस देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
महत्वाच्या तारखा....
ऑनलाइन अर्जाची सुरुवात - 16 ऑगस्त 2020.अंतिम तारीख- 15 सप्टेंबर 2020
शिक्षणया भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कमीतकमी 50 टक्के गुण असावेत. शिवाय सोबत आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असावा.
वयाची अटRRC Recruitment 2020 साठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे. आरक्षणासाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. 1 जानेवारी 2020 नुसार वय पाहिले जाणार आहे.
एससी/एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य़ वर्गांसाठी 100 रुपये शुल्क आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
किम जोंग उन संकटात; बहिणीला बनविले उत्तराधिकारी? दिली मोठी जबाबदारी
भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या
'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्
कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव
तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले