Railway Enquiry: भारतात दररोज रेल्वेने लाखो-करोडो लोक प्रवास करतात. या महागाईच्या काळात प्रवास करण्यासाठी रेल्वे हे एकमेव सुरक्षित आणि किफायतशीर साधन आहे. पण, अनेकदा असे घडते की, लोकांची तिकीटं कन्फर्म होत नाहीत, किंवा कन्फर्म तिकीट असूनही त्यांना काही ना काही त्रास होतो.
अशा त्रासामुळे त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा दोन नियमाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुखाचा जाईल. प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. त्यांची माहिती नसल्याने प्रवाशांना अनेकदा अडचणीतून जावे लागते. भारतीय रेल्वेने देशभरात चालवल्या जाणाऱ्या बहुतांश गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. यामध्ये प्रवाशांना रात्रीही प्रवास करावा लागतो.
हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे
प्रवाशांना सर्वात जास्त त्रास होतो जेव्हा ते झोपलेले असतात आणि टीटी उठवून तिकीट तपासू लागतो. पण तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की रेल्वेच्या नियमांनुसार, TT तुम्हाला तिकीट तपासण्यासाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत उठवू शकत नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला असेल, तर त्यांना हा नियम लागू होत नाही.
मधल्या बर्थमुळे इतरांना त्रासप्रवासादरम्यान मधोमध बर्थ असलेल्या प्रवाशांचीही मोठी अडचण होते. मधल्या बर्थच्या प्रवाशाने सीट उघडल्यास इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना बसायला त्रास होतो. पण रेल्वेच्या नियमानुसार मिडल बर्थचा प्रवासी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेतच मधली बर्थ उघडू शकतो. इतरवेळी प्रवाशाने बर्थ उघडला तर त्याची तक्रार रेल्वेकडे केली जाऊ शकते. सहप्रवासी रात्री 9 वाजल्यानंतर मधला बर्थ उघडण्यास नकार देत असतील तरही तुम्ही रेल्वेकडे तक्रार करू शकता.