रेल्वे सिग्नलच्या वायर तोडून चोरी करणारे अटकेत
By admin | Published: August 31, 2015 9:30 PM
पुणे : रेल्वे सिग्नलच्या दिव्यांच्या वायर तोडून चोरी करणा-या दाम्पत्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दाम्पत्याकडून १३ हजार रुपयांची रोकड आणि चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ईसपु-या आलमचंद्या काळे आणि सपना ऊर्फ काळी ईसपु-या काळे अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी श्रीपाद दत्तात्रय ...
पुणे : रेल्वे सिग्नलच्या दिव्यांच्या वायर तोडून चोरी करणा-या दाम्पत्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दाम्पत्याकडून १३ हजार रुपयांची रोकड आणि चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ईसपु-या आलमचंद्या काळे आणि सपना ऊर्फ काळी ईसपु-या काळे अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी श्रीपाद दत्तात्रय महाजन (रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. महाजन गुरुवारी मुंबई-कोल्हापूर साद्री एक्सप्रेसमधून पुणे ते सांगली असा प्रवास करत होते. त्यांची गाडी फुरसुंगी रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्यावेळी आरोपींनी खिडकीमधून हात आतमध्ये घालत महाजन यांच्या पत्नीची पर्स चोरुन नेली होती. पर्समध्ये काही रोख रक्कम आणि मोबाईल होता. चोरी करण्यासाठी या दोघांनीही रेल्वे सिग्नलच्या दिव्यांच्या वायर तोडल्या होत्या. सिग्नलच्या काचा फोडून यंत्रणेमध्ये गडबड केली. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपींबाबत माहिती मिळवून कर्जत येथे ही कारवाई करण्यात आली. ---------उंड्री येथील अपघातात बालकाचा मृत्यू पुणे : दुकानामधून बिस्किटे घेऊन घराकडे परत जात असलेल्या सहा वर्षीय मुलाचा भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात उंड्री येथील वडाची वाडीमधील आरोनेस्ट सोसायटीसमोर शनिवारी संध्याकाळी घडला. संतोष महादेव चिन्नर (वय ०६ रा. आरोनेस्ट सोसायटी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक सुधीर कामेश्वर पांडे (वय ३६ रा. सिद्धीविनायक सोसायटी, वडाची वाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष त्याच्या सोसायटीच्या समोर असलेल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये गेला होता. बिस्किटे घेऊन घरी जात असतानाच रस्ता ओलांडताना त्याला भरधाव मोटारीची धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या संतोष याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु त्याचा उपचारांपुर्वीच मृत्यू झालेला होता.