नवी दिल्ली : आतापर्यंत रेल्वेचे अधिकारीच परदेशांच्या दौ-यावर जात असतात. पण यंदा रेल्वेने प्रथमव गँगमेन, ट्रॅकमेन व इतर अ-राजपत्रित कर्मचारी विदेश दौ-यावर पाठवले आहे.ही यात्रा त्यांच्या नोकरीच्या कामाशी संबंधित नसून, रेल्वेने त्यांना सिंगापूर आणि मलेशियाच्या सहा दिवसांच्या सुटीवर पाठवले आहेत. या दौºयाच्या खर्चाचा २५ टक्के भाग हा कर्मचारी देत असून व ७५ टक्के भाग हा स्टाफ बेनेफिट फंडमधून (एसबीएफ) केला जाणार आहे.क आणि ड वर्गातील हे कर्मचारी असून, जे निवृत्तीच्या जवळ आहेत, त्यांना या दौºयासाठी प्राधान्य दिले आहे. या दौºयात हे कर्मचारी सिंगापूरमधील युनिव्हर्सल स्टुडिओज, सेंटोसा आणि मलेशियातील कुआला लुम्पूर सिटी टूर, पेट्रोनास टॉवर्स, बाटु केव्हज आणि जेंटिंग हायलँडसला भेट देतील. कर्मचाºयांच्या या दौºयाचा प्रस्ताव डिसेंबरमध्ये पाठवला आणि एका महिन्याच्या आत हे कर्मचारी विदेशात पोहोचले आहेत.
रेल्वेचे गँगमेन, ट्रॅकमेन प्रथमच विदेश दौ-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 2:06 AM