शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतून रेल्वेला मिळाले १४00 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 11:40 PM

रेल्वेला प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांतून मोठा महसूल तर मिळतोच, पण प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतूनही रेल्वे प्रशासनाने वर्षभरात म्हणजे २0१६-१७ या आर्थिक वर्षांत

नवी दिल्ली : रेल्वेला प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांतून मोठा महसूल तर मिळतोच, पण प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतूनही रेल्वे प्रशासनाने वर्षभरात म्हणजे २0१६-१७ या आर्थिक वर्षांत तब्बल १४00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कात करण्यात आलेली वाढ हे त्यामागील मोठे कारण आहे, असे स्पष्ट झाले आहे.अनेक जण बाहेरगावी जाण्यासाठी दोन ते तीन महिने आधी तिकिटे काढून ठेवतात आणि काही ना काही कारणास्तव शेवटच्या क्षणी प्रत्यक्षात जाणे शक्य नसल्याने ती रद्द करण्याची पाळी त्यांच्यावर येते. त्यातून रेल्वेने मोठा महसूल मिळवायला सुरुवात केली आहे. तिकीट रद्द करण्यासाठीच्या शुल्कामध्ये रेल्वेने नोव्हेंबर २०१५ मध्ये दुप्पट वाढ केली. त्याचाच फायदा म्हणून वर्षभरात १४00 कोटी रुपयांची कमाई रेल्वेला झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेमध्ये रेल्वेच्या या मोठ्या कमाईची माहिती दिली.नोव्हेंबर २०१५ मध्ये तिकीट कॅन्सलेशन फीमध्ये वाढ करण्यात आली. तेव्हापासून प्रवाशाने एसी ३ टियरचे तिकीट प्रत्यक्ष प्रवासाच्या ४८ तास अगोदर रद्द केल्यास १८० रुपयांचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही रक्कम केवळ ९0 रुपये होते. याच पद्धतीने एसी २टियरचे तिकिट रद्द केल्यास १00 रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क आकारणे सुरू झाले. ही दुप्पट वाढ १४00 कोटी रुपयांच्या कमाईस कारणीभूत ठरली.तसेच स्लीपर क्लासमधील कन्फर्म तिकिट रद्द केल्याबद्दलरेल्वेने नोव्हेंबर २0१५ पासून प्रवाशांकडून ६0 रुपयांऐवजी १२0 रुपये आकारणेसुरू केले आहे आणि सेकंड क्लासचे तिकिट केल्यास त्यासाठी ३0 रुपयांऐवजी ६0 रुपये शुल्कआकारणी सुरू केली आहे.तात्काळमधूनही मिळते अधिक रक्कमयाशिवाय प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास रेल्वे त्या आसनावर वा ठिकाणी अन्य प्रवाशांची व्यवस्था करतेच. त्यामुळे तिथेही पैसा मिळतो. त्यापैकी अनेक तिकिटे तात्काळ या व्यवस्थेद्वारे घ्यावी लागतात आणि अर्थातच त्यासाठी प्रवाशांना जादा पैसा मोजावा लागतो. रेल्वेला असा मिळणारा महसूल वेगळाच!कोच आधीचे शुल्क नवीन शुल्कएसी २ टियरचे १00 २००एसी ३ टियरचे ९0 १८०स्लीपर क्लासचे ६0 १२0