नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या काळात लोक अनंत अडचणी सोसत असताना सरकारने मात्र नफेखोरी केली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला.‘दररोज एक टष्ट्वीट’ या मोहिमेत हिंदीतून केलेल्या टष्ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, देशावर साथीच्या रोगाचे सावट आहे व लोक अडचणीत आहेत; पण हे जनताविरोधी सरकार मात्र आपत्तीतही नफेखोरी करून स्वत:चे खिसे भरत आहे.या टष्ट्वीटसोबत गांधी यांनी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमीही जोडली. स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालवून रेल्वेने ४२९ कोटी रुपये कमावले, असे त्या बातमीत म्हटले होते.या विशेष रेल्वेगाड्यांनी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या भाड्याचे पैसे भरण्याचे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले होते. त्याचे काय झाले, असे आता लोक विचारत आहेत.लगेच उत्तर...रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या या आरोपाला लगेच टिष्ट्वटरवरूनच उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, ज्यांनी देश लुटला असेच लोक अनुदानाला नफा म्हणू शकतात. विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविताना रेल्वेला राज्य सरकारांकडून जेवढे पैसे मिळाले त्याहून जास्त पैसे रेल्वेने स्वत: खर्चकेले.उत्पन्नाहून सहापट खर्चअधिकृत आकडेवारीनुसार या ‘श्रमिक’ गाड्या चालविण्यासाठी रेल्वेने २,१४२ कोटी रुपये खर्च केले व त्यातून रेल्वेला ४२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.‘आरटीआय’ कार्यकर्ते अजय बोस यांच्या अर्जाच्या उत्तरात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २९ जूनपर्यंत रेल्वेने ४,६१५ गाड्या चालवून ४२८ कोटी मिळविले होते.
‘लॉकडाऊनमध्ये रेल्वेने केली नफेखोरी’; राहुल गांधींच्या आरोपावर लगेचच उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 6:25 AM