नवी दिल्ली : यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्यासह हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी वर्तविलेल्या भाकितानुसार केरळमध्ये मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे, विज्ञान आणि तंत्रशास्त्र मंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.भारतीय हवामान खात्याची मौसमी अंदाज व्यक्त करण्याची कौशल्यपूर्ण यंत्रणा जगातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक सरस आहे. दीर्घावधीच्या हवामान अंदाजानुसार यंंदा पावसाचे प्रमाणे १०६ टक्के राहण्याची शक्यता आहे.यात फारतर पाच टक्के घट वा वाढ होईल. २००५ पासून मान्सूनचा पूर्वअंदाज व्यक्त करण्याची पद्धत सुरु करण्यात आल्यानंतर आजमितीपर्यंत १० वर्षापर्यंत (२००५-१४) मान्सूनबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
केरळात मे अखेर थडकणार पाऊस
By admin | Published: May 05, 2016 4:00 AM