ठाणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अॅपवर अवघ्या १८ दिवसात १३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये ४ त्कारारी या लेखी स्वरूपातील आहे. त्यापैकी ३४ तक्रारींचा अवघ्या १०० मिनिटात निपटारा करण्यात आला आहे. या अॅपवर तक्रारी करतांना सेल्फी फोटो काढून अपलोड करण्यात आले असल्याचे देखिल आढळून आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागून करण्यात आली असून त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी व्हिजील या मोबाईल अॅपचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविली जात आहे. या तक्रारी नोंदविताना अनेकदा तक्रारदार हे त्या प्रसंगाचे फोटो काढून तो दुसऱ्या ठिकाणाहून अपलोड करत आहे. त्यामुळे तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अधिकचा वेळ खर्ची पडत आहे.
असे असले तरी, सी - व्हीजील अॅपवर प्राप्त झालेल्या १३३ तक्रारींपैकी ३४ तक्रारींचा १०० मिनिटात निपटारा करण्यात आला आहे. तर, १०३ तक्रारींवरील कारवाई पूर्ण करून तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
सेल्फी फोटोंमुळे कर्मचारी आवाकलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी सुरु करण्यात आलेल्या सी व्हिजील अॅपवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अॅपवर तक्रारींचा फोटो टाकताना तक्रारदारांनी सेल्फी फोटो काढून टाकल्याने अधिकारी व कर्मचारी देखिल आवक झाले आहे. त्यानुसार आतापर्यंत सी व्हिजील ऑपवर अशा २८ तक्रारींमध्ये सेल्फी फोटो अपलोड करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोस्टर, फलकाबाबत तक्रारीच अधिक१६ मार्च पासून लागू झालेल्या आचारसंहिता भंगाच्या आतापर्यंत १८ दिवसात सी व्हिजील अॅपवर १३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३४ तक्रारी अवघ्या १०० मिनीटात कारवाई करण्यात आली. या तक्रारींमध्ये राजकीय पोस्टर, फलकबाजी तसेच मोबाईलवरील जाहिराती आदींचा समावेश आहे.