पाच वर्षांत निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस, भाजपाने खर्च केले ३ हजार ५८५ तर काँग्रेसकडून १४०५ कोटी रुपये खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:56 AM2022-02-18T09:56:12+5:302022-02-18T09:57:04+5:30

Election In India: गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील निवडणुका ह्या कमालीच्या खर्चिक झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणली आहे. मात्र तरीही राजकीय पक्ष प्रचारामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात.

Rain of money in elections in five years, BJP spent Rs 3,585 crore while Congress spent Rs 1,405 crore | पाच वर्षांत निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस, भाजपाने खर्च केले ३ हजार ५८५ तर काँग्रेसकडून १४०५ कोटी रुपये खर्च

पाच वर्षांत निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस, भाजपाने खर्च केले ३ हजार ५८५ तर काँग्रेसकडून १४०५ कोटी रुपये खर्च

Next

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील निवडणुका ह्या कमालीच्या खर्चिक झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणली आहे. मात्र तरीही राजकीय पक्ष प्रचारामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने ३ हजार ५८५ कोटी रुपये खर्च केले. तर काँग्रेसने १४०५ कोटी रुपये खर्च केले.सेंटर फॉर मीडिया स्टडीजने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३० हजार कोटी रुपये खर्च झाले होते.

एकट्या भाजपाने गेल्या पाच वर्षांत ३ हजार ५८५ रुपये निवडणुकांवर खर्च केले होते. १ हजार ४०५  कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. हा आकडा २०१५-१६ पासून २०१९-२० पर्यंतचा आहे. ही माहिती राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.दरम्यान, यावेळी एकट्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये चार हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. हा पैसा हा मागच्या दरवाजाने येत असतो. त्यामुळेच निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा कॅश पकडला जात आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात २० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने  उत्तर प्रदेशमधून १९१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशात ११५ कोटी रुपयांची रोकड सापडली होती.

Web Title: Rain of money in elections in five years, BJP spent Rs 3,585 crore while Congress spent Rs 1,405 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.