शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पाऊस थांबला, पुराचा विळखा मात्र कायम

By admin | Published: December 04, 2015 2:58 AM

तीन दिवसांपासून सुुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गत ४० वर्षांमध्ये प्रथमच अडयार नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या रात्रीपासून पाऊस थांबला असला तरी चेम्बरामबक्कम

चेन्नई : तीन दिवसांपासून सुुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गत ४० वर्षांमध्ये प्रथमच अडयार नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या रात्रीपासून पाऊस थांबला असला तरी चेम्बरामबक्कम जलाशयातून ३० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने चेन्नईच्या अनेक नव्या भागांमध्ये पूर आला आहे. अनेक वस्त्या अद्यापही जलमय असल्याने लोक अद्यापही आपापल्या घरात अडकून पडले आहेत. अजूनही अनेक लोक रेल्वेस्थानक व बसस्थानकांवर अडकून आहेत. चेन्नई विमानतळावर अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलास पाचारण करण्यात आले आहे. रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प असून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.सर्वोतोपरी मदत - सरकारतामिळनाडूतील पुरात मृत्युमुखी पडलेल्या व प्रभावित लोकांबद्दल संवेदना व्यक्त करीत केंद्र सरकारने सर्वोतोपरी मदतीची ग्वाही दिली आहे. संकटाच्या याक्षणी सरकार तामिळनाडूतील लोकांसोबत असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. गेल्या २४ तासांत ३३० मि.मी. पावसाची नोंद झाल्याने चेन्नईला एखाद्या बेटाचे रूप आले आहे. हवाई दल, लष्कराचे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. केंद्र सरकार पूरप्रभावित जनतेसोबत आहे, असे राजनाथ म्हणाले. (वृत्तसंस्था)दुधाची पिशवी शंभर रुपये, भाजीपाला ९० रु. किलोपावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरप्रभावित चेन्नईत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही वीज, वाहतूक आणि संपर्क सेवा खंडित राहिल्याने चेन्नईकरांच्या समस्येत भर पडली. दूध आणि पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी लांबचलांब रांगा लागल्या. याचदरम्यान दुधाची एक पिशवी १०० रुपयांत तर भाजीपाला ८० ते ९० रुपये किलो भावात विकल्या गेला. ३० रुपयांत मिळणारी पाण्याची बाटली १५० रुपयांत विकली गेली. शहरातील बहुतांश सुपर मार्केट व हॉटेल बंद आहेत वा त्यातील सामग्री संपली आहे.बचावकार्य युद्धस्तरावरचेन्नई व तामिळनाडूच्या पूरप्रभावित भागांमध्ये लष्कर, हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस आदींनी युद्धस्तरावर मदतकार्य आरंभले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपल्या बचाव कर्मचाऱ्यांची संख्या गुरुवारी दुपटीने वाढवत १२०० केली. अनेक भागांत अन्नपाण्याची पाकिटे पुरवली जात आहेत.आतापर्यंत शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.फेसबुकचे ‘सेफ’ बटन फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटने चेन्नई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत, ‘सेफ’ नावाचे बटन उपलब्ध करून दिले आहे. फेसबुक वापरकर्त्याने आपल्या खात्यावरील ‘सेफ’ या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचा मजकूर त्याच्या मित्रांना आपोआप कळेल.गुगलनेही मुख्य पानावर ‘रिसोर्स आॅफ चेन्नई फ्लड’ नावाचे लिंक दिले आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या माहितीसोबतच पुराबाबतची माहितीही कळू शकते; शिवाय गुगलने पुराचा एक व्हिडिओही अपलोड केला आहे.अभूतपूर्व पावसामुळे चेन्नईत उद्भवलेली प्राणहानी व वित्तहानी पाहून मी दु:खी आहे. या संकटाच्या क्षणी माझी प्रार्थना आणि संवेदना तामिळनाडूच्या लोकांसोबत आहे.- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती