ऑनलाइन लोकमत -
जम्मू काश्मीर, दि. 28 - जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी आणि नाले भरुन वाहत आहेत. पुराचं पाणी अनेक भागांमध्ये शिरलं असून जानीपूर भागात पाण्याच्या प्रवाहात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक घरांचंही नुकसान झालं आहे.
पुराचं पाणी घुसल्याने अनेक महत्वाची ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. कार्यालय, पोलिस चौकी, पूल, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. गाडीगड परिसरातील पोलीस चौकी परिसरात 4 फुटापर्यंत पाणी भरलं आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला असून गरज लागल्यास बचावकार्याची तयारीही केली आहे. प्रशासनाकडून कर्मचारी आणि पोलिसांना देखील अलर्ट देण्यात आला आहे.
Visuals of heavy rainfall in Rajouri district of J&K yesterday (In pic: An overflowing river) pic.twitter.com/h4hJyxYTzp— ANI (@ANI_news) July 28, 2016