शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

हैदराबादेत पावसाचा कहर

By admin | Published: September 01, 2016 4:32 AM

हैैदराबादेत मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे दोन इमारती कोसळून बुधवारी सात जणांना प्राण गमवावे लागले. मृतांत चार बालकांचा समावेश आहे

हैैदराबाद : हैैदराबादेत मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे दोन इमारती कोसळून बुधवारी सात जणांना प्राण गमवावे लागले. मृतांत चार बालकांचा समावेश आहे. येथील बहुतांश भागात पाणी साचल्यामुळे शहरातील वाहतुकीचेही तीनतेरा झाले आहेत. पावसामुळे आज सकाळी अनेक भागांत वाहतूक ठप्प होऊन गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भाग जलमय झाल्यामुळे लोकांना घरेदारे सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. बांधकाम सुरू असलेली भिंत झोपडीवर कोसळून एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मृतांत आईवडील आणि दोन बालकांचा समावेश आहे. दुसऱ्या घटनेत घराचा एक भाग कोसळून एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा अंत झाला. मध्यप्रदेशात वीजेचे दोन बळीमध्यप्रदेशात वीज कोसळून दोन वेगवेगळ््या घटनांत तरुण जोडपे मृत्युमुखी पडले तर इतर सात जण जखमी झाले. या दोन्ही दुर्घटना मंगळवारी रात्री घडल्या. (वृत्तसंस्था)दोन वाहनांत चिरडून आठ ठारहैदराबाद येथे कार दोन वाहनांमध्ये चिरडली जाऊन आठ जण ठार झाले. मृतांत सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहराजवळील टोलनाक्यावर मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे कार रस्त्यावर उभ्या असलेल्या समोरच्या ट्रकवर आदळली आणि आठ जण जागीच मृत्युमुखी पडले. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी सहा जण अभियांत्रिकी आणि पदवी महाविद्यालयांचे विद्यार्थी होते. २० ते ३० वर्षे वयोगटातील हे विद्यार्थी एकमेकांचे मित्र होते.