ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3- शाहरुख आणि सलमान याच्यातलं कोल्ड वॉर पूर्ण फिल्म इंडस्ट्रीला परिचित आहे. ईदच्या दिवशी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा रईस आणि सलमान खानचा सुलतान हे चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुखच्या रईस सिनेमाची तारीख पुढे ढकलली आहे.
शाहरुखच्या चित्रपटाचे निर्माते रितेश सिद्धवानी यांच्याकडून ही माहिती मिळते आहे. शाहरुख, नवाजुद्दीन सिद्दिकी, माहिरा खान यांनी रईस सिनेमा 26 जानेवारी 2017 प्रदर्शित करण्याचं जाहीर केलं आहे.
याआधी बॉक्स ऑफिसवर रईस आणि सुलतान आमने-सामने येणार असल्याचीच बॉलिवूडमध्ये चर्चा होती. मात्र काहीच दिवसांपूर्वी शाहरुखनं दोन्ही चित्रपटांची तारीख मागे-पुढे असावी, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे दोन्ही सिनेमे एक-दुस-याला नुकसान पोहोचवणार नाहीत, असं मत त्यावेळी शाहरुख खाननं मांडलं होतं.