"पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून पैसा उकळणे हे आर्थिकदृट्या देशविरोधी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:23 PM2020-05-06T19:23:10+5:302020-05-06T19:27:17+5:30
पेट्रोल आणि डिझेल किमतीवर अनुक्रमे 10 आणि 13 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्कात (एक्साइज ड्युटी) वाढ केली आहे. सरकारच्या आदेशानुसार पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेसच्या स्वरूपात प्रतिलिटर आठ रुपये आकारले जातील. त्याचबरोबर विशेष अतिरिक्त शुल्क म्हणून पेट्रोलवर प्रतिलिटर 2 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 5 रुपये द्यावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल किमतीवर अनुक्रमे 10 आणि 13 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 6 मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने निशाणा साधला आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर वाढवल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवून देशातील नागरिकांच्या खिशातून 1.4 लाख कोटी रुपये उकळणे हे आर्थिकदृट्या देशविरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. केंद्र सरकारने या पैशांपैकी 75 टक्के वाटा राज्यांना द्यावा. यामुळे लोकांवरील ओझं कमी होईल अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देशातील जनतेला लुबाडणे हे राष्ट्रविरोधी असल्याचं म्हटलं आहे.
Special Congress Party Briefing via video conferencing:https://t.co/otbFHV4KBI
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 6, 2020
'संपूर्ण देश हा कोरोनाचा सामना करत आहे. देशातील गरीब, स्थलांतरीत मजूर, दुकानदार आणि छोटे व्यापाऱ्यांकडे आता पैसा शिल्लक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून देशातील 130 कोटी जनतेला अक्षरश: लुबाडत आहे' असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. तसेच, भाजपा स्वत:ची सुटकेस भरण्याचं काम करत असल्याचा आरोपही प्रियंका यांनी केला आहे. 'कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात झाली असून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा मिळायला हवा. मात्र, भाजपा सरकार सातत्याने एक्साईज ड्युटी वाढवत असून जनतेला मिळणारा सगळा फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे' असा आरोप त्यांनी केला.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढाईत कसं काम करतंय मोदी सरकार?; भारतीय म्हणतात...https://t.co/VgUjiSUdqy#CoronaUpdatesInIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2020
पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही. तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलची एमआरपी जशीच्या तशीच राहील. कोरोनाच्या महारोगराईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडील काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांनी किमतीत सातत्यानं घसरण सुरूच ठेवली होती. ही वाढ पूर्णपणे अतिरिक्त अबकारी शुल्काच्या स्वरुपात असल्याने त्याचा महसूल केंद्र सरकारला प्राप्त होईल.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : अनोखा आदर्श! लॉकडाऊनमध्ये पार पडला विधवा सुनेचा पुनर्विवाह
CoronaVirus News : कोरोनाच्या लढाईत कसं काम करतंय मोदी सरकार?; भारतीय म्हणतात...
CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी