२ जी स्पेक्ट्रम घोटाळा : सीबीआयचा विशेष न्यायालयापुढे खुलासानवी दिल्ली : माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी २ जी स्पेक्ट्रम वाटपासंबंधी धोरणात्मक मुद्यांवर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची दिशाभूल केली, असा महत्त्वाचा खुलासा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी विशेष न्यायालयात केला. या प्रकरणी अंतिम युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील आनंद ग्रोवर यांनी सांगितले की, राजा यांनी इतर आरोपींसोबत कटकारस्थान रचून आरोपींच्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी टू जी परवाना वाटपाची मुदत वाढविली होती. एवढेच नाहीतर त्यांनी स्वान टेलिकॉम प्रायव्हेट लिमिटेड व युनिटेक वायरलेस (तामिळनाडू) लिमिटेडसारख्या अपात्र कंपन्यांना स्पेक्ट्रम परवाने दिले. काही आरोपींसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे धोरण बदलून तत्कालीन विधि मंत्रालयाचा प्रस्तावही फेटाळण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)महत्त्वाची धोरणात्मक प्रकरणे उच्चाधिकारप्राप्त मंत्रिगटाकडे पाठविण्यात यावीत, असे या प्रस्तावात सुचविण्यात आले होते याकडेही ग्रोवर यांनी लक्ष वेधले.राजा यांच्या वतीने २ नोव्हेंबर २००७ रोजी तत्कालीन पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या पत्राच्या हवाल्याने विशेष सरकारी वकिलांनी उपरोक्त खुलासा केला. 1 या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद सुनावणीच्या पुढील तारखेला २५ मेपर्यंत सुरू राहील. २ जी स्पेक्ट्रम वाटपासंबंधी या खटल्यात राजा, द्रमुकच्या खासदार कानिमोझी आणि काही कॉर्पोरेट अधिकाऱ्यांसह अन्य १५ जण आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.2 २ जी स्पेक्ट्रमसाठी १२२ परवाने देताना सरकारचा ३०,९८४ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असा आरोप सीबीआयने केला होता. सर्वोच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी २०१२ रोजी हे वाटप रद्द केले होते.
राजा यांनी केली सिंग यांची दिशाभूल
By admin | Published: April 16, 2015 1:34 AM