न्यूयॉर्क : जगातील १०० प्रभावी व्यक्तींमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, टेनिस स्टार सानिया मिर्झा, अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई, फ्लिपकार्टचे बिन्नी बंसल, सचिन बंसल यांचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, गतवर्षी या यादीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावर्षी या यादीत समावेश नाही. आयएमएफमध्ये काम करताना राजन यांनी २००३ ते २००६ च्या दरम्यान सब प्राईम संकटाची भविष्यवाणी केली होती. टेनिस स्टार सानियाबाबत टाईमने म्हटले आहे की, या खेळाच्या बाबतीत असलेला सानियाचा विश्वास कौतुकास्पद आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचीही यात स्तुती करण्यात आली आहे. फ्लिपकार्टचे बिन्नी बंसल आणि सचिन बंसल यांच्या बाबतीत म्हटले आहे की, त्यांनी कंपनीचे मूल्यांकन १३ अब्ज डॉलर केले आहे. या यादीत पर्यावरण क्षेत्रातील सुनीता नारायण यांचा समावेश आहे. या यादीत भारतीय वंशाचे अभिनेते व हास्य कलाकार अजित अंसारी व लास्ट माईल हेल्थचे सीईओ भारतीय वंशाचे राज पंजाबी यांचे नावही आहे.
‘टाईम’च्या यादीत राजन, सानिया मिर्झा, प्रियंका चोप्रा
By admin | Published: April 23, 2016 2:47 AM