मतदान जास्त हाेवाे की कमी, सत्ता परिवर्तन झालेच! तीन दशकांत ६ निवडणुकांमध्ये राहिली परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:12 AM2023-11-27T10:12:38+5:302023-11-27T10:13:41+5:30
Rajasthan Assembly Election: गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे.
जयपूर : गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे. भाजपने १९९३मध्ये जनता दलाच्या साथीने सरकार स्थापन केले हाेते. तर काॅंग्रेसने २००८मध्ये बसपच्या विधायकांना पक्षात ओढून सरकार स्थापन केले हाेते.
- राजस्थानमध्ये यावेळी ७३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच तुलनेत हा आकडा कमी दिसत आहे.
- मतदान रात्री उशीरपर्यंत सुरू असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढू शकताे.
- पुन्हा सत्ता परिवर्तन हाेणार की काॅंग्रेसचेच सरकार पुन्हा येणार, हे ३ डिसेंबरलाच कळणार आहे.
गेल्या ३० वर्षांमध्ये असा राहिला सत्तेचा कल
१९९३ : यावर्षी भाजपला बहुमत मिळविता आले नाही. मात्र, भाजपने जनता दलाला साेबत घेऊन सरकार स्थापन केले.
१९९८ : काॅंग्रेसने अशाेक गेहलाेत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली. काॅंग्रेसला १५३ तर भाजपला ३३ जागा मिळाल्या.
२००३ : भाजपने या निवडणुकीत १२० जागा जिंकल्या. तर काॅंग्रेसला ५६ जागा मिळाल्या. गेहलाेत यांचा पराभव करुन वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या.
२००८ : मतदानात किरकाेळ घट झाली. काॅंग्रेसने बसपच्या ६ आमदारांना साेबत घेऊन सरकार स्थापन केले. गेहलाेत मुख्यमंत्री झाले.
२०१३ : १६३ जागा जिंकून प्रचंड बहुमतासह वसुंधरा राजे यांनी सरकार स्थापन केले. काॅंग्रेसला केवळ २१ जागा मिळाल्या.
२०१८ : भाजप आणि काॅंग्रेसमध्ये माेठी चुरस यावेळी दिसली. मात्र, पुन्हा सत्ता परिवर्तन झाले. १०० जागा जिंकून काॅंग्रेसने सरकार स्थापन केले.