'भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 01:37 PM2018-12-02T13:37:33+5:302018-12-02T14:18:12+5:30
पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.
जयपूर : पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. प्रचारसभेदरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी परदेशात पळ काढणारे कर्जबुडवे उद्योगपती नीरव मोदी आणि ललित मोदीवरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, काँग्रेसनं आपल्याला चार गांधी दिले आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनं तीन मोदी दिले आहेत, नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी. नवज्योतसिंग सिद्धूंच्या या टीकेला भाजपा काय प्रत्युत्तर देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Navjot Singh Sidhu in Kota, Rajasthan: Congress gave us 4 Gandhis, Rajiv Gandhi, Indira Gandhi, Sonia Gandhi and Rahul Gandhi. BJP gave us 3 Modis, Nirav Modi, Lalit Modi and the one sitting in Ambani’s lap Narendra Modi. #RajasthanElections2018pic.twitter.com/SP7YDOhcLP
— ANI (@ANI) December 2, 2018
दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीच्या 200 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.
दुसरीकडे, करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले.
Get your facts right before you distort them,
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) November 30, 2018
Rahul Gandhi Ji never asked me to go to Pakistan.
The whole world knows I went on Prime Minister Imran Khan’s personal invite.
शिवाय, अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. याचा संदर्भ घेऊन सिद्धू यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत. यावरुन तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा.