Gehlot Vs Pilot: काँग्रेस हायकमानचा गेहलोतांना झटका, सचिन पायलटांचं राजकीय वजन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:54 PM2021-06-30T19:54:08+5:302021-06-30T19:55:41+5:30

राजस्थानातील जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जवळपास गेल्या 11 महिन्यांपासून ठप्प आहे. येथे नियुक्त्यांसाठी तयारी सुरू झाली, की काही ना काही अडचणीही येतात. मात्र, आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघटनात्मक नियुक्त्यांच्या कामाला वेग आला आहे.

Rajasthan Big jolt to ashok gehlot congress high command ask panel name directly | Gehlot Vs Pilot: काँग्रेस हायकमानचा गेहलोतांना झटका, सचिन पायलटांचं राजकीय वजन वाढणार?

Gehlot Vs Pilot: काँग्रेस हायकमानचा गेहलोतांना झटका, सचिन पायलटांचं राजकीय वजन वाढणार?

googlenewsNext

जयपूर - राजस्थानकाँग्रेसमध्येसचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद सुरू आहे. यातच आता काँग्रेस हाईकमानने मुख्यमंत्री गेहलोत यांना झटका दिला आहे. काँग्रेस नेतृत्वाने जिलाध्यक्षांच्या नियुक्तीसाठी थेट जिल्हा प्रभारींकडूनच नावे मागविली आहेत. अर्थात काँग्रेसच्या जिलाध्यक्षांच्या नियुक्तीचा निर्णय आता राजस्थान काँग्रेस नव्हे  तर पक्ष श्रेष्ठी करतील. यामुळे, आता पायलट यांचे राजकीय वजन वाढेल, असे बोलले जात आहे. (Rajasthan Big jolt to ashok gehlot congress high command ask panel name directly)

राजस्थानातील जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जवळपास गेल्या 11 महिन्यांपासून ठप्प आहे. येथे नियुक्त्यांसाठी तयारी सुरू झाली, की काही ना काही अडचणीही येतात. मात्र, आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघटनात्मक नियुक्त्यांच्या कामाला वेग आला आहे. काँग्रेसमध्ये लवकरच जिल्हाध्यक्षांसह इतर पदांसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीला बाजूला सारून थेट एआयसीसीने थेट पॅनल मागविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सचिन पायलट 6 दिवस दिल्लीत थांबले, ना राहुल भेटले ना प्रियंकां गांधींची भेट झाली

सर्वसाधारणपणे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमानेच पॅनल दिल्लीला पाठवीले जातात. यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतात. मात्र, यावेळी पीसीसीऐवजी थेट एआयसीसीनेच जिल्हाध्यक्षांची नावे मागवली आहेत. जिल्हा प्रभारींना 30 जूनपर्यंत तीन-तीन नावांचे पॅनल पाठविण्यास सांगण्यात आले आहे. अर्थातच आजच पॅनलची नावे पाठविण्याची अखेरची तारीखही आहे.

थेट नावे मागविण्याला काहीच हरकत नाही - डोटासरा
थेट नावे मागविल्यासंदर्भातील प्रश्नाव राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डेटासरा म्हणाले, पीसीसीला नावे मागून-मागून चार महिने झाले आहेत. थेट नावे मागविण्याला काहीच हरकत नाही आणि मलाही नावे द्यायला सांगण्यात आले आहे. डोटासरा म्हणाले, सर्व नेत्यांशी चर्चा करून जिल्हा अध्यक्षांच्या नावांवर निर्णय घेण्यात येईल आणि पीसीसीने पाठविलेल्या नावांवरच पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. 

Web Title: Rajasthan Big jolt to ashok gehlot congress high command ask panel name directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.