नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेले राजकीय संकट आणि सुप्रीम कोर्टात सोमवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वीच बहुजन समाज पार्टीचे (बीएसपी) सरचिटणीस सतीश मिश्रा यांनी रविवारी राजस्थानमधील आपल्या सहा आमदारांना व्हिप जारी केला असून काँग्रेस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करण्यास सांगितले आहे.
बहुजन समाज पार्टीने जारी केलेल्या व्हिपनुसार, राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडून विश्वासदर्शक ठराव मांडला गेल्यानंतर मतदानावेळी किंवा अन्य कोणत्याही कार्यकाळात सर्व आमदारांना सरकारविरोधात मतदान करण्यास सांगितले आहे. व्हिपच्या म्हणण्यानुसार, जर कोणत्याही आमदाराने पार्टीने जारी केलेल्या व्हिपच्या विरोधात मतदान केले. तर, त्या आमदारावर कारवाई करण्यात येईल आणि विधानसभा सदस्यत्व रद्द केले जाईल. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी हे व्हिप जारी केले आहे.
बहुजन समाज पार्टीकडून राज्यातील सर्व सहा आमदारांव्यतिरिक्त राज्यपाल कलराज मिश्रा आणि विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये कोणत्याही राष्ट्रीय पार्टीचे राज्य स्तरावर विलीनीकरण करता येणार नाही, कारण सर्व आमदारांनी पार्टीच्या (बसपा) निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या सर्व आमदारांना पार्टीकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो. याआधारे रविवारी पक्षाचे सरचिटणीस सतीश मिश्रा यांनी आपल्या पार्टीच्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे.
बहुजन समाज पार्टी उच्च न्यायालयात जाणारआता बहुजन समाज पार्टीने व्हिप जारी केला आहे. मात्र, बहुजन समाज पार्टीला राज्य घटक काँग्रेसमध्ये विलीन होण्यास राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. जवळपास १ वर्षापूर्वी बहुजन समाज पार्टीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले आहे, अशा परिस्थितीत व्हिप कसा लागू होईल? दरम्यान, बहुजन समाज पार्टी आता यासंदर्भात राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या मंजुरीच्या निर्णयाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
आणखी बातम्या...
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!