अलवर : राजस्थानमधील काँग्रेस सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षी इथे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी येत्या 1 एप्रिलपासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 500 रुपयांना गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे. भारत जोडो यात्रेअंतर्गत अलवर जिल्ह्यातील मालाखेडा येथे आयोजित सभेत गेहलोत यांनी सोमवारी ही मोठी घोषणा केली.
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि आरोप करताना म्हटले, ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय यांसारख्या सर्व संस्थांना आजकाल भीती वाटते की त्यांना वरून काय आदेश येतील हे माहित नाही. गेहलोत म्हणाले की, दारिद्र्यरेषेखालील (BPL) अशा लोकांना मी यावेळी जाहीर करतो की, गरीब आहेत आणि उज्ज्वला योजनेशी संबंधित आहेत अशा वर्गवारीचा आम्ही अभ्यास करू. त्यानंतर पुढील वर्षी 1 एप्रिलनंतर 1040 रुपयांचा सिलेंडर 500 रुपयांना मिळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"