शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

महिलेची विवस्त्र अवस्थेत धिंड काढली; मुख्यमंत्र्यांनी पीडितेची भेट घेऊन जाहीर केली आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 4:43 PM

राजस्थानच्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं.

राजस्थानच्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. इथे पतीनं पत्नीचे कपडे फाडून तिची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याची घटना घडली. या घटनेनंतर राजस्थानचेमुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतापगड गाठून पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पीडितेला सरकारी नोकरी आणि १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. 

संबंधित पीडितेची भेट घेतल्यानंतर गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महिला आता गरोदर असून तिला आर्थिक मदतीची गरज आहे, पीडित आणि कुटुंबीय म्हणतील त्याप्रमाणे आम्ही एफडी करून घेऊ. तसेच पोलिसांनी काही तासांतच सर्व ११ आरोपींना पकडले. गावात नेटवर्क नसतानाही पोलिसांनी चोख काम केले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पोलिसांचे कौतुक केले. 

ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्यानंतर आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून पोलीस महासंचालकांना एडीजी क्राईमला घटनास्थळी पाठवून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा गुन्हेगारांना सुसंस्कृत समाजात स्थान नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. आरोपींना तात्काळ तुरुंगात टाकले जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल आणि शिक्षा होईल, अशी ग्वाही देखील गेहलोत यांनी दिली. 

व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई दरम्यान, पीडित महिलेची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेचा व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी लगेचच या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आणि आरोपी पतीसह सर्व ११ आरोपींना अटक केली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतChief Ministerमुख्यमंत्री