राजस्थान काँग्रेस प्रभारी माकन यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 08:07 AM2022-11-17T08:07:46+5:302022-11-17T08:08:13+5:30
Congress: राजस्थानचे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवून म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेमुळे मी नाराज आहे.
- आदेश रावल
नवी दिल्ली : राजस्थानचेकाँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवून म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेमुळे मी नाराज आहे. काँग्रेससोबत अनेक पिढ्यांपासून संबंध आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निष्ठावान सैनिक म्हणून आपण दिल्लीत काम करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ज्या लोकांनी पक्षाविरुद्ध बंड केले, त्यांना भारत जोडो यात्रेची जबाबदारी दिली आहे आणि यावरूनच माकन नाराज आहेत. डिसेंबरमध्ये यात्रा राजस्थानात प्रवेश करेल. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठौर यांच्याकडे यात्रेची जबाबदारी आहे.