"हे योग्य नाही..."; स्वतःऐवजी पतीला तिकीट मिळाल्याने काँग्रेस आमदार प्रचंड संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 01:08 PM2023-10-24T13:08:01+5:302023-10-24T13:13:38+5:30
राजस्थानमधील अलवरच्या रामगड मतदारसंघातून एक महिला आमदाराने पतीला तिकीट दिल्याने नाराज झाल्याची घटना समोर आली आहे.
निवडणुकीच्या काळात राजस्थानमधील अलवरच्या रामगड मतदारसंघातून एक महिला आमदार पतीला तिकीट दिल्याने नाराज झाल्याची घटना समोर आली आहे. तिकीट रद्द केल्याने संतापलेल्या या महिला आमदाराने तिकीट रद्द करून पक्षाने योग्य काम केले नाही, असंही म्हटलं आहे. साफिया खान या रामगड विधानसभेच्या आमदार आहेत. यावेळी त्यांच्या जागी काँग्रेसने त्यांचे पती जुबेर खान यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत साफिया खान यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.
या प्रकरणावर जुबेर यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. जुबेर हे प्रियंका गांधी यांच्या जवळचे असल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त जुबेर सध्या दिल्लीत आहेत. या जागेवर भाजपाने यापूर्वी ज्ञानदेव आहुजा यांना बराच काळ उमेदवारी दिली होती, जे नेहमी जिंकत होते, परंतु 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ज्ञानदेव आहुजा यांचे तिकीट कापून सुखवंत सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती. अशा स्थितीत काँग्रेसचा विजय झाला आणि साफिया खान मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. आता रामगडमध्ये भाजपा कोणाला तिकीट देते हे पाहावे लागेल.
विधानसभा निवडणुकीत भाजप असो वा काँग्रेस, सर्वांनाच विरोध होत आहे. भाजपाची दुसरी यादी बाहेर आल्यानंतर अलवर शहर आणि थानगजी विधानसभा मतदारसंघातून निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. राजस्थानमध्ये भाजपने आतापर्यंत 124 जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अलवरच्या थानागाजी विधानसभा मतदारसंघातून भाजपाने हेमसिंह भदाना यांना उमेदवारी दिली आहे. या घोषणेनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्याच उमेदवाराच्या पुतळ्याचे दहन केले
हेमसिंह भदाना यांनी 2018 मध्ये थानगाजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या जागेवर महंत प्रकाश दास आणि रोहितेश घंगाल दावा करत होते. अशा स्थितीत पक्षाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपाने अलवर शहर विधानसभा मतदारसंघातून संजय शर्मा यांना तिकीट दिलं आहे.