जयपूर -राजस्थानात व्हिप उल्लंघन प्रकरणावर आज उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या आदेशानंतर, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी राजभवनात जाऊन राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्यासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. यावेळी गेहलोत गटाच्या काँग्रेस आमदारांनी राजभवन परिसरात ठिय्या द्यायला सुरुवात केली. तसेच गेहलोत जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. हे सर्व आमदार बसमध्ये बसून राजभवनात पोहोचले आहेत.
राजभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेअरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. याबैठकीत, आमदारांनी एकत्रित राहावे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे, एवढेच नाही, तर आपले सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे, अशी खात्रीही गेहलोतांनी आमदारांना दिली.
काय म्हणाले उच्च न्यायालय -राजस्थान उच्च न्यायालयात (Rajasthan High Court) आज राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटीशीवर सुनावणी झाली. यावेळी, विधानसभा अध्यक्षांविरोधात सचिन पायलट गटाने दाखल केलेली याचिका योग्य असल्याचे म्हणत राजस्थान उच्च न्यायालयाने सचिन पायलट गटाला मोठा दिलासा दिला. म्हत्वाचे म्हणेज, न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांना बजावलेल्या नोटीशीलाही स्थगिती दिली आहे. यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना पायलट आणि त्यांच्या समर्थकांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. परिणामी परिस्थिती जैसेथेच राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढेही सुरूच राहील.
केंद्र सरकारकडून राज्यपालांवर दबाव टाकला जातोय - शुक्रवारी पत्राकर परिषदेत बोलताना अशोग गेहलोत म्हणाले, होते, की राज्यपालांवर केंद्र सरकारकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी कुणाच्याही दबावात यायला नको. एवढेच नाही, तर राज्यातील जनतेने संतप्त होऊन राजभवनाला घेराव घातला, तर आपली जबाबदारी नसेल, असेही गेहलोतांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या -
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर