राजस्थानमधील करौली जिल्ह्यातीलल मेहंदीपूर बालाजी येथे एका आश्रमात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. १२ जानेवारी रोजी मेहंदीपूर बालाजी येथील रामाकृष्णा आश्रमामध्ये देहराडून येथील एक कुटुंब आले होते. त्यात आई-वडील आणि मुलांचा समावेश होता. दरम्यान, या चारही जणांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
एकाच वेळी चार जणांचे मृतदेह सापडल्याने आश्रमामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती टोडाभीम पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, सापडलेल्या आधारकार्डमधून मृतांची ओखळ पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानुसार मृतांची ओळख उत्तराखंडमधील रहिवासी असलेले सुरेंद्र कुमार उपाध्याय (60), कमलेश (५५), नितीन (३२) आणि नीलम (२५) अशी पटली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, हे कुटुंब १२ जानेवारी रोजी मेहंदीपूर बालाजी येथे आलं होतं. या चौघांमधील दोघेजण बेडवर झोपलेले होते. तर दोघेजण खाली झोपले होते. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले.