निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 08:24 PM2020-07-26T20:24:26+5:302020-07-26T20:24:32+5:30

पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

rajasthan crisis  Bjp trying to topple elected rajasthan government says priyanka gandhi vadra​​​​​​​ | निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली -राजस्थानात सध्या राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री गेहलोतांची खुर्ची धोक्यात असल्याचे दिसत आहे. अशी स्थिती असतानाच, राजभवन आणि राज्य सरकार याच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) भाजपावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

प्रियंका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने भाडपावर हल्ला केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की राजस्थानातील संकट पाहता, भाजपाची इच्छा स्पष्ट आहे. ते निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियंका म्हणाल्या सध्या देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. सध्या देशाला जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारने, जनतेने निवडून दिलेले सरकारं पाडण्याचा प्रयत्न करत आपली इच्छा स्पष्ट केली आहे. जनता याचे उत्तर नक्की दिईल.

यापूर्वी राजस्थानात विधानसभा अधिवेशन बोलावण्यावरून काँग्रेसच्या काही इतर नेत्यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला होता. एवढेच नाही, तर काँग्रेस नेत्यांनी राज्य पालांवर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही केला आहे.

काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनीही राजस्थानातील परिस्थितीसंदर्भात राज्यपाल कलराज मिश्र यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सिंघवी म्हणाले, राज्यपाल हे राज्य सरकारची मदत आणि सल्ल्याने निर्णय घेण्यासाठी बांधील असतात. मात्र, राजस्थानचे राज्यपाल केंद्रात बसलेल्या आपल्या मास्टर्सचाच आवाज ऐकत आहेत. तसेच, राज्यपाल कलराज मिश्र यांनी, संवैधानिक मर्यादांचे पालन करून ते या प्रकरणावर निर्णय घेतील, असा विश्वास काँग्रेसला दिला होता. मात्र,  विधानसभा अधिवेशन बोलावत नसल्याने त्यांची मनिषाही स्पष्ट झाली आहे.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर धरणे धरण्याची घोषणा -
सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांच्या कथित बंडामुळे ‘गॅस’वर असलेल्या अशोक गेहलोत यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल कलराज मिश्र यांनी विधानसभा अधिवेशन तातडीने येत्या सोमवारीच बोलवावे यासाठी काँग्रेसने शनिवारी अधिक आक्रमक पवित्रा घेत यासाठी वेळ पडली तर राष्ट्रपतींना भेटण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर धरणे धरण्याची घोषणा केली. दुसरीकडे गेहलोत सरकार पाडण्याचे ‘छुपे सूत्रधार’ असल्याचा आरोप केला जात असलेल्या भाजपाने, अशा प्रकारे धाकदपटशा करून राज्यपालांवर असंविधानिक दबाब आणण्याचा निषेध करून राज्यपालांनी त्याला मुळीच बळी पडू नये, असा आग्रह धरला.

पायलट यांच्या ‘बंडा’वर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी व्हायची आहे. तोपर्यंत त्यांना अपात्रता ठरवण्यापासून संरक्षण मिळालेले आहे. काहीही करून न्यायालयाचा निर्णय होण्याआधी विधानसभेत बहुमत सिद्ध करून या कथित बंडाची हवा काढून घेणयाचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...

शिवराज सिंह चौहान रुग्णालयात; असा आला पत्नी, मुलांचा कोरोना रिपोर्ट

कोरोना अजूनही पूर्वी प्रमाणेच घातक!, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी करायला सांगितला 'हा' मोठा संकल्प

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

 

Web Title: rajasthan crisis  Bjp trying to topple elected rajasthan government says priyanka gandhi vadra​​​​​​​

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.