राजस्थान संकट : पायलटांच्या मनधरणीसाठी प्रियंका गांधी पुन्हा सक्रिय, 'या' दोन नेत्यांकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 02:13 PM2020-07-16T14:13:24+5:302020-07-16T14:42:21+5:30

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

rajasthan crisis now again Priyanka gandhi vadra in active mode | राजस्थान संकट : पायलटांच्या मनधरणीसाठी प्रियंका गांधी पुन्हा सक्रिय, 'या' दोन नेत्यांकडे जबाबदारी

राजस्थान संकट : पायलटांच्या मनधरणीसाठी प्रियंका गांधी पुन्हा सक्रिय, 'या' दोन नेत्यांकडे जबाबदारी

Next
ठळक मुद्देबंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीविरोधात उच्च न्यायालयातकाँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार हरियाणातील मानेसरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत.बुधवारी विधानसभा अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या 19 आमदारांना नोटिस पाठवून 17 जुलैपर्यंत स्पष्टिकरण देण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली - राजस्थानातील राजकीय संकटात आपले सरकार वाचवण्यात अशोक गेहलोतांना यश आले आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या अडचणी दूर झालेल्या नाहीत. आता या प्रकरणात प्रियंका गांधी वाड्रा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. प्रियंका गांधी यांनी केसी वेणुगोपाल आणि अहमद पटेलांना सचिन पायलट यांच्याशी बोलायला सांगितले आहे. तसेच पक्षात परत यायला सांगितले आहे. तसेच पायलट गटातील आमदारांनाही फोन करून परत येण्यास सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, अशोक गेहलोत अद्यापही आपल्याच आविर्भावात आहेत.

बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीविरोधात उच्च न्यायालयात  -
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. बुधवारी विधानसभा अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या 19 आमदारांना नोटिस पाठवून 17 जुलैपर्यंत स्पष्टिकरण देण्यास सांगितले आहे. सरकारचे भविष्य काहीही असो, मात्र ही अत्यंत कठीन स्थिती आहे, असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. 

क्वारंटाइन सेंटर बनले पायलट गटाचे रिसॉर्ट -
काँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार हरियाणातील मानेसरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत. असा दावा केला जातो, की ते ज्या रिसॉर्टमध्ये थांबले आहेत, ते क्वारंटाइन सेंटर आहे. रात्रितून घडलेल्या या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काँग्रेसने आज या बंडखोर आमदारांना हरियाणा भाजपा सरकारच्या संरक्षणातून बाहेर यऊन जयपूरला परत येण्याचे सांगितले आहे. बेस्ट वेस्टर्न रिसॉर्टबाहेर क्वारंटाइन सेंटर असे लिहिले आहे. कुठल्याही बाहेरील व्यक्तीला आत जाण्याची परवानगी नाही. गेटवर उपस्थित सुरक्षा रक्षकाचे म्हणणे आहे, की आत कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

कमी वयात दिल्या मोठ्या जबाबदाऱ्या -
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले होते, "सचिन पायलट यांना काँग्रेसने कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना अगदी कमी वयात जी राजकीय ताकद दिली गेली, तेवढी तागद कदाचित कुणालाही दिली गेली नसेल. 2003 मध्ये सचिन पायलट राजकारणात आले. यानंतर 26 वर्षांचे असतानाच 2004 मध्ये त्यांना काँग्रेसने खासदार बनवले. 32 वर्षांचे असताना त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. 34 वर्षांचे असतानाच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची दबाबदारी दिली गेली. 40 व्या वर्षी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव त्यांच्यासोबत होता.''

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

Web Title: rajasthan crisis now again Priyanka gandhi vadra in active mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.