शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
3
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
4
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
5
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
6
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
7
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
8
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
9
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
10
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
11
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
13
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
14
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
15
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
16
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
17
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
18
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
19
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
20
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच

रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 3:07 PM

Rajasthan News: राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या मुलग्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आशू बैरवा हा उघड्या जीपमधून जात रील्स बनवताना दिसत आहे.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या मुलग्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आशू बैरवा हा उघड्या जीपमधून जात रील्स बनवताना दिसत आहे. तसेच या जीपच्या आजूबाजूला सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस हे धावपळ करताना दिसत आहेत.  आशू बैरवा याच्यासोबत तीन इतर तरुणही दिसत आहेत. त्यामधील एकाचं नाव कार्तिकेय भारद्वाज असल्याचं समोर आलं आहे. कार्तिकेय हा काँग्रेसचे नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांचा मुलगा आहे. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याविरोधात सांगानेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दरम्यान, मौजमजा आणि रील्स बनवण्यासाठी नेत्यांच्या मुलांना पोलिसांचं संरक्षण कुठल्या कारणानं  मिळालं, असा प्रश्न आता विचारला जात आहे.   राजस्थानचे उपमुख्यमंत्री असलेल्या प्रेमचंद बैरवा यांच्याजवळ परिवहन विभागाची जबाबदारी आहे. मात्र त्यांचाच मुलगा हात सोडून गाडी चालवून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार तरुण उघड्या जीपमधून जाताना दिसत आहेत. तसेच पावसात भिजून मौजमजा करत आहेत. त्यांच्या मागे मागे पोलिसांची वाहनंही धावत आहेत. कधी हे वाहन जीपच्या मागे तर कधी पुढे धावताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत नेमकी माहिती समोर येऊ शकलेली नाही.  ही जीप चालवत असलेला तरुण हा उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांचा मुगला असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला बसलेला तरुण हा काँग्रेस नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांचा मुलगा आहे. तसेच ही जीप काँग्रेस नेत्याची असल्याची माहितीही समोर आली आहे. काँग्रेस नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांचा मुलगा कार्तिकेय भारद्वाज याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.   

टॅग्स :Rajasthanराजस्थानTrafficवाहतूक कोंडी