"सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज..."; अशोक गेहलोतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 11:01 AM2023-12-04T11:01:53+5:302023-12-04T11:10:38+5:30

निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही गेहलोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला आहे.

rajasthan election 2023 acharya pramod krishnam takes dig at ashok gehlot says no magic worked | "सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज..."; अशोक गेहलोतांवर हल्लाबोल

"सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज..."; अशोक गेहलोतांवर हल्लाबोल

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. यामध्ये काँग्रेसच्या पराभवामुळे अशोक गेहलोत यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही गेहलोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज 'खुर्ची' सोडावी लागली ."

कृष्णम यांच्याशिवाय मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) असलेले लोकेश शर्मा यांनीही काँग्रेसच्या पराभवासाठी अशोक गेहलोत यांना जबाबदार धरले आहे. शर्मा या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे तिकीट मागत होते. मात्र, पक्षाने त्यांना संधी दिली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शर्मा यांनी 3 डिसेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. 

शर्मा यांनी लिहिलं, "काँग्रेस पक्ष निःसंशयपणे राजस्थानमधील प्रथा बदलू शकला असता, परंतु अशोक गेहलोत यांना कधीही बदल नको होता. हा काँग्रेसचा पराभव नसून अशोक गेहलोत यांचा पराभव आहे." शर्मा यांच्या मते, या विधानसभा निवडणुकीमध्ये गेहलोत यांचा चेहरा वापरून, त्यांना सूट देण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षाने निवडणूक लढवली. पण त्यांचा अनुभव किंवा जादू चालली नाही. तर दर वेळेप्रमाणे यावेळीही काँग्रेसला त्यांच्या योजनांच्या आधारे विजय मिळवता आला नाही. 

अशोक गेहलोत यांनी निकालावर भाष्य करताना  "मी नेहमीच सांगत आलो आहे की, मी जनतेचा जनादेश स्वीकारेन आणि भविष्यातील सरकारला माझ्या शुभेच्छा देतो. मला आशा आहे की ते राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी पुढील सरकार काम करेल. विधानसभा निवडणुकीचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे" असं म्हटलं आहे. 
 

Web Title: rajasthan election 2023 acharya pramod krishnam takes dig at ashok gehlot says no magic worked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.