Rajasthan Assembly Election Results Live: 'राजे'स्थान खालसा; जनतेची काँग्रेसच्या हाताला साथ

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 07:22 AM2018-12-11T07:22:09+5:302018-12-11T14:06:13+5:30

Rajasthan Election Results Live: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2018; राजस्थानात दर वर्षांनी पाच वर्षांनी सत्ताधारी बदलतात, असं इतिहास सांगतो

Rajasthan Assembly Election Results Live: 'राजे'स्थान खालसा; जनतेची काँग्रेसच्या हाताला साथ | Rajasthan Assembly Election Results Live: 'राजे'स्थान खालसा; जनतेची काँग्रेसच्या हाताला साथ

Rajasthan Assembly Election Results Live: 'राजे'स्थान खालसा; जनतेची काँग्रेसच्या हाताला साथ

जयपूर- राजस्थानातलं भाजपा सरकार कायम राहणार की काँग्रेसचं राज्य येणार, याचं उत्तर आज मिळणार आहे. राजस्थानात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा इतिहास आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार की मुख्यमंत्री वसुंधरा राजे नवा इतिहास घडवणार, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. 

राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपानं तब्बल 163 जागा जिंकल्या होत्या. भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 46.03% इतकी होती. तर काँग्रेसला 34.27 टक्के मतांसह अवघ्या 21 जागा मिळाल्या होत्या. गेल्याच आठवड्यात राजस्थानच्या जनतेनं नवे सत्ताधारी निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी राजस्थानात सत्तापालट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आठपैकी सहा एक्झिट पोल्समधून भाजपाला राजस्थान गमवावं लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतर दोन एक्झिट पोल्सनी भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होईल, असा अंदाज वर्तवला आहे. 
 

LIVE

Get Latest Updates

03:42 PM

राजस्थानमधील काँग्रेसचे नवनियुक्त आमदार जयपूरमध्ये उद्या एकत्र येणार; पुढील रणनीती ठरवणार; मुख्यमंत्री कोण होणार यावर होणार चर्चा



 

02:42 PM

काँग्रेस 101, भाजपा 72 जागांवर आघाडीवर

02:10 PM

काँग्रेस 101, भाजपा 73 तर इतर 25 जागांवर पुढे

01:59 PM

काँग्रेस 101, भाजपा 72 जागांवर आघाडीवर

01:38 PM

काँग्रेस 97, तर भाजपा 78 मतदारसंघात पुढे 

01:28 PM

काँग्रेस 96, तर भाजपा 79 जागांवर आघाडीवर

01:17 PM

काँग्रेस 93, तर भाजपा 81 जागांवर पुढे

01:11 PM

काँग्रेस 91; तर भाजपा 86 मतदारसंघात आघाडीवर

01:06 PM

आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल; तरीही भाजपाविरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यास त्यांचं स्वागत- काँग्रेस नेते सचिन पायलट

01:01 PM

काँग्रेस 91, भाजपा 84 जागांवर आघाडीवर

12:48 PM

काँग्रेस नेते सचिन पायलट 8 अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात- सूत्र



 

12:25 PM

काँग्रेसला 92, भाजपाला 82 जागांवर आघाडी

12:13 PM

जनतेचा कौल काँग्रेसला; आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल- अशोक गेहलोत



 

11:51 AM

काँग्रेस 102 जागांवर आघाडीवर; भाजपा 73 मतदारसंघात पुढे

11:17 AM

मुख्यमंत्री कोण होणार, ते पक्षाध्यक्ष ठरवतील- अशोक गेहलोत, काँग्रेस नेते



 

11:11 AM

काँग्रेस 102, तर भाजपा 79 जागांवर पुढे

11:00 AM

काँग्रेस 95, तर भाजपा 85 जागांवर पुढे

10:31 AM

काँग्रेसचे सचिन पायलट टोंकमधून 5,295 मतांनी पुढे

10:31 AM

काँग्रेसचे अशोक गेहलोत सरदारपुरामधून 5112 मतांनी आघाडीवर

10:30 AM

झालरपाटण मतदारसंघातून मुख्यमंत्री वसुंधरा राजे 8,845 मतांनी पुढे

10:03 AM

दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष



 

10:02 AM

काँग्रेस 92, तर भाजपा 79 जागांवर पुढे

09:51 AM

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरामधून 5,112 मतांनी आघाडीवर

09:48 AM

मुख्यमंत्री वसुंधराराजे झालरपाटण मतदारसंघातून 4,055 मतांनी आघाडीवर

09:44 AM

काँग्रेस 89, तर भाजपा 76 मतदारसंघात आघाडीवर

09:34 AM

काँग्रेस 88 जागांवर पुढे; भाजपा 74 मतदारसंघात आघाडीवर

09:27 AM

भाजपा आणि काँग्रेसची गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी

09:20 AM

काँग्रेस 76, तर भाजपा 66 मतदारसंघात आघाडीवर

09:18 AM

काँग्रेस नेते सचिन पायलट आघाडीवर; कार्यकर्त्यांचा जल्लोष



 

09:01 AM

काँग्रेस 64, तर भाजपा 52 जागांवर आघाडीवर

09:00 AM

राजस्थान, छत्तीसगडमधील सध्याची परिस्थिती काँग्रेसच्या बाजूनं- दिग्विजय सिंह



 

08:58 AM

टोंक मतदारसंघातून सचिन पायलट पुढे



 

08:47 AM

काँग्रेस आघाडीवर; कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष



 

08:44 AM

काँग्रेसची जोरदार मुसंडी; 43 जागांवर आघाडी

08:40 AM

काँग्रेसचे सचिन पायलट, सी. पी. जोशी आघाडीवर

08:29 AM

काँग्रेस 14, तर भाजपा 7 जागांवर आघाडीवर

08:21 AM

काँग्रेस 7, भाजपा 5 जागांवर आघाडीवर

08:19 AM

दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा यज्ञ



 

08:17 AM

भाजपा 2, तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर

08:14 AM

काँग्रेसचे नेते सचिन पायलट आघाडीवर

08:13 AM

मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर

08:13 AM

राजस्थानातील पहिला कल भाजपाच्या बाजूनं

08:07 AM



 

08:04 AM

मतमोजणीला सुरुवात; आधी पोस्टल मतांची मोजणी होणार

07:29 AM

आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात

Web Title: Rajasthan Assembly Election Results Live: 'राजे'स्थान खालसा; जनतेची काँग्रेसच्या हाताला साथ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.