Rajasthan Assembly Election 2023 : पायलटांचे विमान हेलकावे खाऊ लागले, भाजपचे प्रतियोगी बालकनाथ, वसुंधराराजे आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:09 AM2023-12-03T11:09:28+5:302023-12-03T11:42:15+5:30
Rajasthan Assembly Election 2023 Live : सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. परंतू, त्यांना यश येत नव्हते. गेहलोत पायलट यांच्या हातात धुरा देण्यास तयार नव्हते.
पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चार राज्यांचा आज निकाल जाहीर होत आहे. यापैकी तीन राज्यांत भाजपा बहुमतात येत असल्याचे दिसत आहे. यापैकी दोन महत्वाची राज्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाची प्रचंड बहुमताने सत्ता येत आहे. अशातच काँग्रेसच्या दिग्गजांना विजयासाठी देखील झगडावे लागत आहे.
(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)
राजस्थानमध्ये बंड फसल्याने राजकीय संघर्षात फसलेले नेते सचिन पायलट ८०० मतांनी पिछाडीवर आहेत. सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. परंतू, त्यांना यश येत नव्हते. गेहलोत पायलट यांच्या हातात धुरा देण्यास तयार नव्हते.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या झालरापाटन सीटवरून १३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे गजराज खटाणा बांदीकुई येथून ५६७१ मतांनी आघाडीवर आहेत. खानपूर येथून काँग्रेसचे सुरेश गुर्जन हे १९५ मतांनी आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असेलेले नाव बालकनाथ हे तिजारा मतदारसंघातून ५००० मतांनी आघाडीवर आहेत.
राजस्थानमध्ये भाजपा १०९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७६ जागांवर आघाडीवर आहे. बसपा दोन जागांवर आघाडीवर आहे. २०० पैकी १९९ जागांवर मतदान झाले होते. इतरांना १२ जागांवर आघाडी मिळत आहे.