'त्या' एका निर्णयानं राजस्थानात डबल धमाका; भाजपा, बसपाला जबर धक्का, काँग्रेसला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:38 PM2020-07-27T15:38:27+5:302020-07-27T15:40:00+5:30

भाजपा आमदाराची याचिका उच्च न्यायालयाकडून रद्द; काँग्रेसला दिलासा

Rajasthan High Court dismisses petition filed by BJP against the merger of 6 BSP MLAs in the Congress | 'त्या' एका निर्णयानं राजस्थानात डबल धमाका; भाजपा, बसपाला जबर धक्का, काँग्रेसला मोठा दिलासा

'त्या' एका निर्णयानं राजस्थानात डबल धमाका; भाजपा, बसपाला जबर धक्का, काँग्रेसला मोठा दिलासा

Next

जयपूर- राजस्थानमध्येकाँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपा आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेली याचिका राजस्थान उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्वच्या सर्व ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्षांतराविरोधात दिलावर यांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयानं फेटाळून लावली.

राजस्थानातल्या बसपाच्या ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याविरोधात भाजपा आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे कारवाईची मागणी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं याचिका रद्दबातल ठरवली.




बसपाची मागणीदेखील रद्द
भाजपा आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपल्यालाही पक्षकार करून घेण्यात यावं अशी मागणी बसपाकडून करण्यात आली होती. त्यावर दिलावर यांचीच याचिका रद्द केली असताना बसपाला पक्षकार करण्याचा प्रश्नच येत नाही, असं न्यायालयानं म्हटलं.

काय आहे प्रकरण?
बसपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या लखन सिंह (करोली), राजेंद्र सिंह गुढा (उदयपुरवाटी), दीपचंद खेडिया (किशनगढ बास), जोगेंदर सिंह अवाना (नदबई), संदीप कुमार (तिजारा) आणि वाजिब अली (नगर, भरतपूर) या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याविरोधात भाजपा आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे तक्रार केली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार सर्व सदस्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी दिलावर यांनी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर न्यायालयात गेले.

Read in English

Web Title: Rajasthan High Court dismisses petition filed by BJP against the merger of 6 BSP MLAs in the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.