उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:09 AM2024-06-04T11:09:36+5:302024-06-04T11:10:17+5:30
Rajasthan Lok sabha Election Result Update: भाजपाने २०१९ मध्ये २५ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०२४ मध्ये वाळवंटातील वारे फिरल्याचे दिसत आहेत.
Rajasthan Lok sabha Election Result: उत्तर प्रदेशमध्ये सपाने भाजपाच्या गडाला सुरुंग लावल्यानंतर आता राजस्थानमध्ये देखील इंडी आघाडी भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. राजस्थानमधील लोकसभेच्या २५ जागांपैकी १२ जागांवर काँग्रेस आणि सहकारी पक्ष आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये भाजप १३ जागांवर तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे.
भाजपाने २०१९ मध्ये २५ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०२४ मध्ये वाळवंटातील वारे फिरल्याचे दिसत आहेत. काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांनी १२ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ९ जागांवर आघाडीवर आहे, नागौरमध्ये आरएलपीचे हनुमान बेनिवाल, बांसवाडामध्ये बीएपीचे राजकुमार रोट आणि सीकरमध्ये सीपीआय(एम)चे अमर आघाडीवर आहेत.
एक्झिट पोल नुसार राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागांपैकी एनडीएला 16 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 5 ते 7 जागा मिळतील. तर इतरांना १ ते २ जागा मिळू शकतात असा अंदाज होता. परंतु सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस पुन्हा एकदा राजस्थानमध्ये जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.
काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार नकुलनाथ छिंदवाडामध्ये १२ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. राजस्थान बारमेरमध्ये केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दौसा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मुरारी लाल मीना सध्या ५४४८१ मतांनी आघाडीवर आहेत.