आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 11:54 AM2019-01-01T11:54:44+5:302019-01-01T12:05:51+5:30
राजस्थानमध्ये झालेल्या वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.
अलवर - राजस्थानमध्ये झालेल्या वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनीही अलवरमधील रैणी भागात असेच एक वक्तव्य केले असून, त्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे ममता भूपेश यांनी म्हटले आहे.
सोमवारी रैणी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ममता भूपेश म्हणाल्या की, ''आमचे प्रथम कर्तव्य हे आमच्या जातीसाठी आहे. त्यानंतर समाजासाठी, त्यानंतर सर्व समाजासाठी. सर्वांसाठी. सर्वांसाठी काम करता यावे हीच आमची इच्छा आहे."
Rajasthan Minister Mamta Bhupesh in Alwar: Pratham karya hamara hamari jaati ke liye, uske baad hamare samaj ke liye, uske baad sarv samaj ke liye, sab ke liye. Hamari mansha yeh rahegi ki hum sabke liye kaam kar paayein. (31.12.2018) pic.twitter.com/TDODe5O23G
— ANI (@ANI) January 1, 2019
दरम्यान ममता भूपेश यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात येताच ममता भूपेश यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती सन्मानाने राहावी, त्याबरोबरच सर्वांसाठी काम व्हावे, असे आम्हाला वाटते, असे त्यांनी सांगितले.