काय सांगता? मंत्र्याचा दूधवाला बिनविरोध निवडून आला; दूध विकता विकता नगरसेवक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:42 AM2021-10-13T10:42:45+5:302021-10-13T10:44:29+5:30

मंत्र्यांचा दूधवाला काँग्रेसच्या तिकिटावर विजयी; भाजपच्या उमेदवाराची माघार

rajasthan minister milkman won the election unopposed in alwar | काय सांगता? मंत्र्याचा दूधवाला बिनविरोध निवडून आला; दूध विकता विकता नगरसेवक झाला

काय सांगता? मंत्र्याचा दूधवाला बिनविरोध निवडून आला; दूध विकता विकता नगरसेवक झाला

Next

अलवर: राजस्थानच्या राज्यमंत्र्याच्या घरी दूध टाकून उदरनिर्वाह करणाऱ्या जगदिशचं नशीब पालटलं आहे. तुलेडामध्ये राहणाऱ्या जगदिश यांचं नशीब अचानक पालटलं आहे. प्रभाग क्रमांक २० मधून जगदिश बिनविरोध निवडून आले आहेत. मंत्र्यांची घरी दूध टाकल्याबद्दल असं बक्षीस मिळेल याची कल्पनादेखील त्यांनी कधीच केली नव्हती. 

कामगार राज्यमंत्री टिकाराम जुली यांच्या प्रयत्नांमुळे जगदिश यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत जगदिश विजयी झाले. काँग्रेसकडून जगदिश निवडणुकीच्या आखाड्यात होते. त्यांचा थेट सामना भाजपच्या उमेदवाराशी होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्यानं जगदिश एकटेच निवडणूक आखाड्यात होते. त्यामुळे ते बिनविरोध विजयी झाले. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्याची माहिती जगदिश यांना नव्हती.

अतिशय गरीब कुटुंबातून येणारे जगदिश जाटव २० ते २२ घरांमध्ये दूध पुरवठा करून उदरनिर्वाह चालवतात. त्यांचं मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांच्या आसपास आहे. शहरातील काही मोजक्या लोकांच्या घरी ते दूध टाकतात. त्यामध्ये कामगार राज्यमंत्री टिकाराम जुली यांचादेखील समावेश आहे. मोती डुंगरी परिसरात जुली यांचं निवासस्थान आहे. टिकाराम जुली आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यामुळेच आपल्याला तिकिट मिळालं आणि आपण बिनविरोध निवडून आलो, असं जगदिश यांनी सांगितलं.

जगदिश जाटव यांनी आधी तुलेडा गावचे सरपंच म्हणून काम पाहिलं आहे. ते आधीपासूनच काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या पत्नी जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये जगदिश सहभागी होतात. त्यामुळेच यावेळी पक्षानं त्यांना नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरवलं. अलवरमध्ये एकूण ४९ प्रभाग आहेत. यातल्या प्रभाग २० मधून जगदिश जाटव विजयी झाले आहेत.

Web Title: rajasthan minister milkman won the election unopposed in alwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.