शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

हुंड्यात १ रुपया घेऊन वाहवा मिळवलेल्या पोलिसाला २ लाख रुपयांची लाच घेताना अटक, ACBची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:52 AM

नार्कोटिक्स विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेल्या अमन फोगट नावाच्या अधिकाऱ्याला जयपूर एसीबीच्या टीमनं २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

राजस्थान-

नार्कोटिक्स विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेल्या अमन फोगट नावाच्या अधिकाऱ्याला जयपूर एसीबीच्या टीमनं २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अमन फोगट हे झुंझुनु जिल्ह्यातील सुजानगढ येथील बडसरी बास नावाच्या गावातील रहिवासी आहेत. अमन फोगट यांचं अडीच वर्षांपूर्वी याच गावात लग्न झालं होतं आणि हुंड्याची पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला छेद देत केवळ १ रुपया घेत लग्न केलं होतं. जिल्ह्यात अमन फोगट यांचं त्यावेळी कौतुक देखील झालं होतं आणि त्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या. कुटुंबातही अमन यांच्या निर्णयाचं कौतुक केलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर अमन फोगट यांच्या वडिलांनी आपल्या सुनेला चारचाकी वाहन गिफ्ट म्हणून दिलं होतं. पण आता अमन फोगट याला लाच घेताना पकडल्याची बातमी कळाल्यानंतर गावात पुन्हा एकदा अमन हे चर्चेचं केंद्रस्थान बनले आहेत. 

अमन फोगट यांचे वडील लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. अबकारी विभागात कार्यरत असलेल्या अमन फोगट यांचे वडील ओमप्रकाश फोगट यांनी अडीच वर्षांपूर्वी मुलाच्या लग्नात हुंडा न घेता याउलट आपल्या सुनेलाच चारचाकी वाहन गिफ्ट देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. इतकंच नव्हे, तर लग्नावेळी गावात भोमाराम स्मृती येथे गावाचं प्रवेशद्वार देखील फोगट कुटुंबीयांनी उभारलं होतं. त्यासाठी जवळपास ३.५ लाख रुपये खर्च आला होता आणि याचंही उदघाटन फोगट कुटुंबाच्या नव्या सुनेच्या हस्ते करण्यात आलं होतं. गावात फोगट कुटुंबाला खूप मोठा मान आहे हे यावरुनच लक्षात येतं. पण मुलाच्या कारनाम्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. 

जयपूर एसीबीच्या पथकानं अमन फोगट यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी देखील झडती घेतली. एसीबीच्या पथकानं घरावर धाड टाकल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली आणि संपूर्ण प्रकरण गावाला कळालं. ज्या कुटुंबाचं उदाहरण आदर्श कुटुंब म्हणून सर्व गावकरी आजवर देत आले होते. त्याच कुटुंबातील व्यक्तीच्या कारनाम्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

मेडिकल स्टोअरवर रंगेहाथ पकडला गेला अधिकारीजयपूरच्या मेडिकल स्टोअरवर कारवाई करताना मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून ५ लाख रुपये लाचेची मागणी अमन फोगट यांनी केली होती. पण अखेरीस २ लाख रुपयांची डील पक्की झाली होती. दुकानदारानं याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानंतर एसीबीनं सापळा रचून अमन फोगट यांना रंगेहाथ पकडलं. एसीबीकडून वरीष्ठ अधिकाऱ्यांना या मिशनसाठी नियुक्त करण्यात आलं होतं. एसीपी कालूराम रावत यांच्या नेतृत्त्वाखाली एसीपी हिमांशु आणि एसपी सुरेश स्वामी यांच्या पथकानं अमन फोगट यांना रंगेहाथ पकडलं. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणRajasthanराजस्थान