Rajasthan: पायलट गद्दार, ते सीएम कसे होऊ शकतात? गहलोत यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 09:15 AM2022-11-25T09:15:28+5:302022-11-25T09:15:57+5:30
Rajasthan:
-शरद गुप्ता
नवी दिल्ली : राजस्थानमधील काँग्रेसचे संकट आणखी गडद झाले आहे. ज्येष्ठ नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे ज्या सचिन पायलट यांच्याबरोबर गुरुवारी मध्य प्रदेशात पदयात्रा करीत होते त्याच पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गद्दार म्हणत होते. पायलट यांच्या निमित्ताने गहलोत पक्षाच्या नेतृत्वावर निशाणा साधत होते.
पायलट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मिळून आपले सरकार पाडण्याचा कट रचला होता, असा आरोप एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गहलोत यांनी केला. ते म्हणाले की, २०२०मध्ये पायलट व त्यांच्या सहयोगी आमदारांनी भाजप मुख्यालयाकडून १०-१० कोटी रुपये घेऊन राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. ज्यांना १० आमदारांचासुद्धा पाठिंबा नाही, अशांना मुख्यमंत्री करण्याबाबत पक्ष विचारही करू शकत नाही; परंतु या चुकीसाठी पायलट यांनी ना पक्षाची ना राजस्थानच्या जनतेची माफी मागितली. ती मागितली असती तर ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मला माफी मागण्याची गरज पडली नसती.
मार्ग खडतर
गहलोत यांना माहिती आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मार्ग अवघड आहे; परंतु ते सचिन पायलट यांचा मार्ग आणखी अवघड करू इच्छित आहेत.
अटकेपासून कोणी रोखले?
nसचिन पायलट यांच्या समर्थकांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पुरावे असतील तर अटक करण्यापासून कोणी रोखले?
n पक्षाने गहलोत यांना गुजरातचे निवडणूक प्रभारी करून विश्वास टाकला होता. त्याला आज त्यांनी तडा दिला, असे त्यांचे म्हणणे आहे.