Rajasthan Political Crisis: ‘ते’ २२ आमदार गेले कुठे?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेसचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:47 AM2020-07-14T11:47:31+5:302020-07-14T15:13:03+5:30
Rajasthan Political Crisis: मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची सोमवारी बैठक घेतली, यात १०६ आमदार असल्याचा दावा केला, त्यानंतर या सर्व आमदारांना जयपूरच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आलं.
जयपूर – राजस्थानमध्ये सत्तेचा संघर्ष वाढत जाताना दिसत आहे, अशातच सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस आमदारांचे शक्तीप्रदर्शन करत सचिन पायलट यांच्या बंडखोरीला उत्तर देण्याची राजकीय खेळी खेळली. त्यानंतर रात्री सचिन पायलट समर्थकांनी एक व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा चर्चेला उधाण आणलं आहे. या व्हिडीओत काँग्रेसचे १६ आमदार दिसत आहे. सचिन पायलट यांच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडीओ आला होता.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची सोमवारी बैठक घेतली, यात १०६ आमदार असल्याचा दावा केला, त्यानंतर या सर्व आमदारांना जयपूरच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आलं. पण अद्यापही राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरचं संकट हटलं नाही. कारण जवळपास २२ आमदार हॉटेलमध्ये नाहीत. आज पुन्हा काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक पार पडणार आहे.(Rajasthan Political Crisis)
जयपूर हॉटेलमध्ये नसणाऱ्या आमदारांची नावे
- सचिन पायलट
- रमेश मीणा
- इंद्राज गुर्जर
- गजराज खटाना
- राकेश पारीक
- मुरारी मीणा
- पी.अर.मीणा
- सुरेश मोदी
- भंवर लाल शर्मा
- वेदप्रकाश सोलंकी
- मुकेश भाकर
- रामनिवास गावड़िया
- हरीश मीणा
- बृजेन्द्र ओला
- हेमाराम चौधरी
- विश्वेंद्र सिंह
- अमर सिंह
- दीपेंद्र सिंह
- गजेंद्र शक्तावत
हे सगळे काँग्रेस आमदार आहेत तर इतर ३ अपक्ष आमदार आहेत, ज्यात सुरेश टांक, ओमप्रकाश आणि खुशवीर सिंह जोजावर यांचा सहभाग आहे. म्हणून एकूण २२ आमदार असे आहेत जे सरकारच्यासोबत नाहीत.
ज्योतिरादित्य शिंदेंची सोडचिठ्ठी आणि सचिन पायलट हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासाठी इतर युवा नेत्यांना काँग्रेसमध्ये पुढे येऊच दिलं जात नाही, हा भाजपाने केलेला आरोप पटतो का? #Rajasthan#SachinPailot
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
दरम्यान सचिन पायलट यांच्या ग्रुपमध्ये आलेल्या व्हिडीओत आमदार इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीणा दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी फॅमिली असा उल्लेख केला आहे. मुकेश भाकर यांनी सांगितले की, काँग्रेसशी प्रामाणिकपणा याचा अर्थ अशोक गहलोत यांची गुलामी आहे, हे आम्ही सहन करणार नाही. सचिन पायलट यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे ३० काँग्रेस आमदारांचे समर्थन आहे. काही अपक्ष आमदारही सचिन पायलट यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा दावा फेटाळत जर सरकारकडे बहुमत असेल तर त्यांनी सभागृहात ते सिद्ध करावं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नाही असं सचिन पायलट यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे.(Rajasthan Political Crisis)
अन्य महत्त्वाच्या बातम्या
दक्षिण चीनच्या सागरी भागात तणाव वाढला; अमेरिकेची थेट चीनला धमकी, तर ड्रॅगनही संतापला
सचिन पायलट यांच्यासोबत आमदार किती? नवा व्हिडीओ जारी करत केला दावा
WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका; जर तुम्ही व्हॉट्सअॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केलं असेल तर...
राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट
सरकार अस्थिर करण्याचं राष्ट्रीय कार्य पडद्यामागून सुरु; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप