Rajasthan Political Crisis: खेळी उलटली; जयपूरहून निघालेले गेहलोत गटाचे 6 मंत्री, 5 आमदार 'बेपत्ता'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 12:17 AM2020-08-01T00:17:43+5:302020-08-01T00:26:20+5:30
आमदारांच्या शिफ्टिंगसंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले होते, की आमचे जे आमदार गेल्या काही दिवसांपासून जयपूर येथे होते त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास दिला जात होता. त्यांच्यावर, तसेच त्यांच्या कुटुंबावर दबाट टाकला जात होता.
जयपूर -राजस्थानात सुरू असलेला राजकीय संघर्ष रोज नवे वळण घेताना दिसता आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या गटातील आमदारांना शुक्रवारी जयपूरहून जैसलमेरला हालवले. आता वृत्त आहे, की या शिफ्टिंगदरम्यान गेहलोत गटातील 11 आमदार 'बपत्ता' झाले आहेत. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसार, गहलोत सरकारमधील 6 मंत्री आणि 5 आमदार अद्याप जैसलमेरपर्यंत पोहोचलेच नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरहून जैसलमेरला न पोहोचणाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री प्रताप सिंह खाचरियावास, आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा, क्रीडामंत्री चांदना, कृषीमंत्री लालचन्द कटारिया, आरोग्य राज्यमंत्री सुभाष गर्ग, सहकारमंत्री उदयलाल आंजना, आमदार जगदीश जांगिड, आमदार अमित चाचाण, आमदार परसराम मोरदिया, आमदार बाबूलाल बैरवा आणि आमदार बलवान पूनिया यांचा समावेश आहे.
आमदारांवर दबाव टाकला जातोय -
तत्पूर्वी, आमदारांच्या शिफ्टिंगसंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले होते, की आमचे जे आमदार गेल्या काही दिवसांपासून जयपूर येथे होते त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास दिला जात होता. त्यांच्यावर, तसेच त्यांच्या कुटुंबावर दबाट टाकला जात होता. त्यांच्यावरील बाहेरील दबाव दूर करण्यासाठी त्यांना शिफ्ट करण्यासंदर्भात विचार केला आणि नंतर त्यांना शिफ्ट करण्यात आले. एवढेच नाही, तर गेहलोत म्हणाले, लोकशाही वाचवणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे
15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...