जयपूर -राजस्थानातील राजकीय संकट वाढतच चालले आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिले आहे. या पत्रात, निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे गेहलोतांनी म्हटले आहे.
सरकार पाडण्यात भारतीय जनता पार्टीचे नेते सामील आहेत. या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा हात आहे. आमच्या पक्षातील अति महत्वकांक्षी नेतेही यात सहभागी आहेत. एवढेच नाही, तर आमदारांचा घोडेबाजार करून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही गेहलोत यांनी या पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी हे पत्र 19 जुलैला लिहिले होते. ते आता समोर आले आहे. गहलोतांनी मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याचाही उल्लेख या पत्रात केला आहे. ते म्हणाले, कोरोना काळात कमलनाथ सरकारदेखील भाजपाच्या कटामुळेच पडले आहे.
गेहलोत म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात जनतेची मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे. मात्र, राज्यातील जनतेने निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आमचे सरकार सूशासन देत आपला कार्यकाळ पूर्ण करेल. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पक्षात बंडखोरी केल्याने गेहलोतांची शुर्ची धोक्यात आली आहे.
गेहलोतांच्या भावाच्या घरावर ईडीचा छापा -राजस्थानात राजकीय संघर्ष सुरू असतानाच, अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे मोठे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या जोधपूरमधील मंडोर येथील घरावर फर्टिलायझर गोटाळाप्रकरणी छापा टाकला. यावेळी ईडीचा चमू पीपीई किट घालून त्यांच्या घरी पोहोचला होता. यापूर्वी गैहलोतांच्या निकटवर्तीय काँग्रेस नेत्यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली होती.
संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह पोहोचला ईडीचा चमू -ईडीचा चमू संपूर्म सुरक्षा व्यवस्थेसह सीएम गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या ठिकानांवर पोहोचला होता. ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या मंडोर येथील घराशिवाय त्यांचे पाटवा येथील कार्यालय आणि दुकानावरही तपास सुरू केला. कारवाईदरम्यान केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे जवानही तैनात करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या -
युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी
फर्टिलायझर घोटाळा : CM गेहलोतांच्या भावाच्या घरावर ED चा छापा, PPE किट घालून पोहोचला चमू
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस