काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 04:43 PM2020-07-14T16:43:56+5:302020-07-14T16:47:50+5:30

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट थोड्याच वेळात बाजू मांडणार असून संध्याकाळी 5 वाजता ते यावर बोलण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दिशाही सांगण्याची शक्यता आहे.

Rajasthan Political Crisis: BJP's Mp Rita bahuguna give offer to Sachin Pilot for join BJP | काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

Next

लखनऊ :गेल्या दोन दिवसांपासून राजस्थानमध्ये सुरु असलेल्या नाराजी नाट्याचा मध्यान्ह झाला असून दुसरा अंक लगेचच सुरु झाला आहे. राजस्थानकाँग्रेसचेसचिन पायलट यांना पक्षाने उप मुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले आहे. यावर लगेचच पायलट यांनीही पक्षाला उत्तर दिले असून त्यांना थेट भाजपामध्ये येण्याची ऑफर मिळाली आहे. 


उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या खासदार आणि राज्याच्या माजी मंत्री रीटा बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट यांना भाजपात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. रीटा यांनी ट्विट करून ही ऑफर दिली आहे. ''आणखी एका काँग्रेस नेत्याचा अपमान झाला आहे. सचिन यांनी देशहित लक्षात घेऊन भाजपामध्ये प्रवेश करायला हवा. राहुल गांधी यांच्या वाईट वागणुकीचे आणखी एक उदाहरण'' असल्याचे ट्विट केले आहे. याआधी सचिन पायलट यांनी ट्विटरवरील आपली काँग्रेसूबाबतची माहिती बदलल्याने काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी खेद व्यक्त केला आहे.



तसेच ज्योतिरादित्या शिंदे यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रतिभेला स्थान नसल्याची टीका करत पायलट यांचे समर्थन केले होते. पायलट यांनी काँग्रेसचा उल्लेख आणि फोटो काढल्यावरून जितिन यांनीही ट्विट केले आहे. सचिन पक्षातील सहकारीच नाहीत तर माझे मित्रही आहेत. पक्षासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे निष्ठेने काम केले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आजूनही परिस्थिती सुधरू शकते अशी आशा आहे. मात्र, स्थिती आता इथपर्यंत येऊन पोहोचली आहे, असे ते म्हणाले आहेत. 


पायलट थोड्याच वेळात बाजू मांडणार असून संध्याकाळी 5 वाजता ते यावर बोलण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दिशाही सांगण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Web Title: Rajasthan Political Crisis: BJP's Mp Rita bahuguna give offer to Sachin Pilot for join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.