जयपूर -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीपूर्वी कॅमेऱ्यासमोर शक्ती प्रदर्शन केले. एवढेच नाही, तर या बैठकीसाठी 102 आमदार उपस्थित असल्याचा दावाही करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर व्हिक्ट्री साइनदेखील केल्याचे दिसून आले. मात्र, अद्याप बैठकीला सुरवात झालेली नाही. (Rajasthan Political Crisis)
यापूर्वी काँग्रेसने पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा व्हीप जारी केला होता. यानंतर रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांच्यासह जे नाराज आमदार आहेत त्यांनी बैठकीला यावे आणि आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन केले होते. यावर, व्हिप केवळ विधानसभेसाठीच जारी केले जाऊ शकते. हा व्हिप कायद्याच्या विरोधात आहे, असे पायलट यांच्या गटाने म्हटले होते.
पायलट समर्थक आमदार गेहलोत यांच्या सोबत -सूत्रांनी दलेल्या माहितीनुसार, भाजपासोबत एकमत न झाल्याने काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या समर्थनात गेलेले 24 पैकी जवळपास अर्धे आमदार पुन्हा निसटले आहेत. हे आमदार आज बैठकीत सहभागी होत आहेत. अद्यापही 12 काँग्रेसचे आणि 3 अपक्ष आमदार पायलट यांच्या संपर्कात आहेत. हे आमदार मात्र बैठकीसाठी आले नाही.
महाराष्ट्रातला चेहरा सावरणार राजस्थान काँग्रेसची नाव? -राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार धोक्यात आहे. याचदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा म्हणून ओळख असलेले खासदार राजीव सातव यांनी राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले आहे. राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना निरोप पाठवला असून, ते आज संध्याकाळीच राजस्थानला रवाना होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. याआधी देखील राजीव सातव यांनी गुजरातमध्ये पक्षबांधणीत मोठं काम केलं होतं. त्याचंच फळ म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
वसुंधरा राजेही अलिप्त -राजस्थानातल्या सत्तासंघर्षावर भाजपाच्या इतर नेत्यांप्रमाणे वसुंधरा राजे कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. यामागे राजकीय गणित असल्याचं राजकीय पंडित सांगतात. गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यामध्ये अतिशय उत्तम राजकीय केमिस्ट्री आहे. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर राजे यांनी त्याविरोधात कोणतीही टीका केलेली नाही. इतकंच नव्हे, तर गेल्या दीड वर्षांत त्या सरकारविरोधात त्या सरकारविरोधात कधीही रस्त्यावर उतरलेल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या -
मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा