नवी दिल्ली: काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडामुळे राजस्थानात काँग्रेसच्या अडचणी (Rajasthan Political Crisis) वाढल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत पायलट यांनी त्यांना थेट बहुमत सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान दिलं. मात्र आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आव्हान देऊन सरकारला धोका पोहोचवल्याप्रकरणी काँग्रेसनं काल सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली. पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्षापदावरून दूर करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींवर राहुल यांनी आज एनएसयूआयच्या बैठकीत अप्रत्यक्ष भाष्य केलं. 'कोणालाही पक्ष सोडायचा असल्यास ते तसं करू शकतात. त्यामुळे तुमच्यासारख्या नेत्यांना संधी मिळते,' असं राहुल गांधींनी एनएसयूआयच्या बैठकीत म्हटल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.
Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या बंडावर राहुल गांधींचं अप्रत्यक्ष भाष्य; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 6:50 PM