Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 09:32 AM2020-07-13T09:32:52+5:302020-07-13T09:44:39+5:30

Rajasthan Political Crisis : काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत.

Rajasthan political crisis kapil sibal says worried for congress | Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"

Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"

googlenewsNext

मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे.  काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी रविवारी दिल्लीत अहमद पटेल यांची भेट घेतली खरी, पण त्यानंतर ते अलीकडेच भाजपामध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली. त्यामुळे ते 30 आमदारांसह भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

"आम्ही कधी जागे होणार?, बहुतेक आमचे घोडे तबेल्यातून निघून गेल्यानंतरच आम्ही जागे होणार आहोत" असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्विट केलं आहे. काँग्रेस व गेहलोत यांनीही पायलट यांच्या बंड मोडून काढायचे आणि पायलट यांना एकटे पाडायचे, ठरविले असावे, असे दिसते. त्यामुळेच राजस्थानात गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप करीत असून प्रत्येक आमदाराला 15 कोटी रुपयांची लालूच दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारीच केला होता.

सचिन पायलट यांनी त्यांच्या गटातील 12 आमदारांसह दिल्लीत तळ ठोकला असल्याचेही वृत्त आहे. पायलट यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली असून गेहलोत यांच्याकडून पक्षपाती वागणूक मिळत असल्याची तक्रार ते पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे कळते. पायलट यांचे शनिवारी रात्री पक्षाचे खजिनदार अहमद पटेल यांच्याशी फोनवर बोलणे झाले. पण तेव्हापासून कोणाचाही फोन उचलत नसल्याने ते नेमके कुठे आहेत, हे समजत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपक्ष आमदार फोडून राजस्थानमधील काँग्रेसचे अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या कथित ‘कारस्थाना’वरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याच संदर्भात सरकारला पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांविरुद्ध गुन्हे नोंदविले. ओम प्रकाश हुडला, सुरेश टांक व खुशवीर सिंग या तीन अपक्ष आमदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल

CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...

या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी

Web Title: Rajasthan political crisis kapil sibal says worried for congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.